Thursday, May 23, 2024
Homeक्रिडा विश्वभारत आणि पाकिस्तानचा दुसरा सामना तारीखही आली समोर

भारत आणि पाकिस्तानचा दुसरा सामना तारीखही आली समोर

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ५ सप्टेंबर २०२३:- भारताने नेपाळवर विजय मिळवला आणि त्यांनी थेट सुपर ४ मध्ये प्रवेश केला आहे पण भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ सुपर ४ मध्ये पोहोचले आहेत. सुपर ४ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांचा सामना नेमका कधी होणार, हे स्पष्ट झाले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची तारीख आता समोर आली आहे.भारताने नेपाळवर १० विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयासह भारताचे गुणतालिकेत तीन गुण झाले आणि त्यांनी सुपर ४ फेरीत प्रवेश केला. दुसरीकडे नेपाळचे आव्हान संपुष्टात आले आहे या विजयासह भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ पुन्हा एकदा आशिया चषकात एकमेकांसमोर उभे ठाकले जाणार आहेत.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा सामना आता सर्वांच्या सुट्टीच्या दिवशी होणार असल्यामुळे चाहत्यांना त्याची मजा घेता येणार आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना हा पावसामुळे रद्द करण्यात आला होता त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येक एक गुण दिला होता. या सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांनी भारताला चांगलेच अडचणीत आणले होते. पण भारताचा डाव संपला आणि पाकिस्तान फलंदाजीला येण्यापूर्वीच जोरदार पाऊस आला. पावसाचा जोर एवढा जास्त होता की त्यानंतर सामान रद्द करण्याचा निर्णय झाला होता. त्यामुळे चाहत्यांचा हिरमोड झाला होता पण आता चाहत्यांनी निराश व्हायचे कारण नाही. कारण आता भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषकात पुन्हा एकदा सामना होणार आहे. हा सामना आता १० सप्टेंबरला खेळवण्यात येणार आहे. हा सामना श्रीलंकेची काजधानी कोलंबो येथे होणार आहे.

त्यामुळे आठ दिवसांत चाहत्यांना भारत आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा सामना पाहायला मिळणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना हा पलिक्कल येथे झाला होता. पण आता दुसरा सामान हा कोलंबो येथे होणार आहे. हा सामना पूर्ण होईल, अशी आशा आता चाहते करत असतील भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषकातील दुसरा सामना आता कधी आणि कुठे होणार आहे, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या सामन्याची उत्सुकता आता क्रिकट विश्वात सर्वांनाच असेल फक्त हा सामना पूर्ण व्हावा आणि त्यामध्ये कोणताही व्यत्यय येऊ नये, अशी प्रार्थना आता चाहते वरुण राजाकडे करत असतील. कारण या सामन्याची जबरदस्त उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे.(AKOLA NEWS NETWORK)

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!