Tuesday, May 21, 2024
Homeताज्या घडामोडीपिक बे अँप अकोलेकरांच्या सेवेत दाखल

पिक बे अँप अकोलेकरांच्या सेवेत दाखल

अकोला न्युज नेटवर्क दिनांक २१ जुलै :- आजकालचे डिजिटलं युग त्यात सर्वांचे व्यस्त जीवन असल्याने सगळंच जग डिजिटलं झाल आहे काही मदत जर लागलीच तर प्रत्येक मदत ही मोबाईल अँप वरून मिळण्यास सुरवात झाली आहे आता त्यात आणखी एक भर पडली असून अकोल्यातील व्यावसायिकाने पिक बे हे अँप तयार केले असून याचा लोकार्पण सोहळा गुरुवारी थाटात संपन्न झाला

आजचे युग हे विज्ञानाचे युग म्हटले जाते. या विज्ञानाच्या साहाय्याने मानवाने अनेक शोध लावले आहेत. त्यामुळे मानवाचे जीवन अगदी सोपे बनले आहे. त्या सर्व शोधांपैकी मोबाइल फोन हा एक विज्ञानाचा एक शोध आहे. ज्यामुळे संपूर्ण जगाचा नकाशा बदलला आहे. त्याच बरोबर लोकांना समजण्याचा आणि मानवाचा विचार करण्याचा आहे. आज मानवाची सर्व कामे ही मोबाइल फोन द्वारे होऊ लागली आहेत. आज बहुतेक व्यवसाय हा मोबाईल फोनच्या साहाय्याने चालत आहे. त्यामुळे काही मिनिटात एक व्यापारी दुसऱ्या व्यापाऱ्याशी कोणताही व्यवहार करू शकतो. तसेच आपला व्यवसाय हा दुप्पट पटीने देखील वाढू शकतो. हिच कल्पना उराशी बाळगून अकोल्याती व्यावसायिक विश्वास रायबोले यांनी ऑनलाईन पॅसेंजर व लोडींग बुकिंग हे अँप अकोलेकरांच्या सेवेत आणले असून या अँप चा काल मान्यवरांच्या उपस्थितीत गुरुकृपा मंगल कार्यालय, जुना आरटिओ रोड, तुकाराम चौक, न्युज येथे थाटात शुभारंभ करण्यात आला. या अँप च्या माध्यमातून आता आपण घर बसल्या कोणतेही वाहन बोलवू शकतो एवढेच नाही तर आपल्याला कोणतेही सामान ने आण करायचे असल्यास देखील पिक बे हे अँप अतिशय उपयुक्त ठरणार आहे. आपल्या मोबाईल च्या गुगल प्ले स्टोवर वर जाऊन पिक बे हे अँप डाउनलोड करताच आपला प्रवास किंवा आपले पोहोचवायचे सामान ने आण करण्यासाठी वाहन उपलब्द होणार असल्याची माहिती पिक बे अँप चे संचालक विश्वास रायबोले यांनी अकोला न्युज नेटवर्क शी बोलतांना दिली

पिक बे अँप लॉंचिंग च्या या दिमाखादार सोहळ्यास प्रमुख उपस्थिती माजी संचालक, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ विजय मलोकर, समाजिक कार्यकर्ते विजय चक्रे, बार असोशियन चे अध्यक्ष एडवोकेट प्रवीण तायडे, अकोला न्युज नेटवर्क चे मुख्य संपादक निलेश धाडीकर आर आर सी न्युज नेटवर्क चे संचालक पंकज देशमुख यांच्या सह इतरीही मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. पिक बे या अँप चा समस्त अकोलेकरांना फायदा होणार असून सर्वानी हे अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून याचा उपभोग घ्यावा असे आवाहन मन्यवरांच्या वतीने करण्यात आले. अनुराग अभंग ann न्युज अकोला.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!