Thursday, December 5, 2024
Homeक्रिडा विश्वIPL टीमच्या ‘दिग्गज’ कोचला काढलं, विराटच्या ‘दोस्ताला’ मिळाली जबाबदारी!

IPL टीमच्या ‘दिग्गज’ कोचला काढलं, विराटच्या ‘दोस्ताला’ मिळाली जबाबदारी!

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक०७ ऑगस्ट २०२३ :-इंडियन प्रीमियर लीगच्या नव्या मोसमात सनरायझर्स हैदराबाद ही फ्रेंचायझी टीम त्यांच्या नव्या प्रशिक्षकासोबत खेळणार आहे. वेस्ट इंडिजचा अनुभवी खेळाडू ब्रायन लाराच्या प्रशिक्षणाखाली संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती. सोमवार, 7 ऑगस्ट रोजी ब्रायन लारा संघातून बाहेर गेला आणि नवीन प्रशिक्षकाच्या नावाची घोषणा (ANN NEWS) सोशल मीडियावर करण्यात आली.इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये पहिल्या फेरीतून बाहेर पडलेला सनरायझर्स हैदराबाद संघ नवीन हंगामात नवीन मुख्य प्रशिक्षकासह खेळण्यास सुरुवात करेल. न्यूझीलंडचा माजी फिरकीपटू डॅनियल व्हिटोरीची संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लारा गेल्या मोसमापर्यंत ही जबाबदारी पार पाडत होता. संघ व्यवस्थापनाच्या वतीने सोमवार, 7 ऑगस्ट रोजी सोशल मीडियावर त्यांचे आभार मानले. 2023 मध्ये सनरायझर्स संघाने 14 पैकी 10 सामने गमावले होते.

सनरायझर्स हैदराबादने नवे प्रशिक्षक डॅनियल व्हिटोरी संघात सामील झाल्याची माहिती दिली. काही दिवसांपूर्वी संघाच्या नव्या प्रशिक्षकाच्या शोधाची माहिती देण्यात आली होती. आता नवीन प्रशिक्षक म्हणून व्हिटोरीच्या आगमनाची माहिती शेअर करण्यात आली आहे. सोशल मीडिया ट्विटमध्ये न्यूझीलंडच्या माजी कर्णधाराचा फोटो शेअर करण्यासोबत असे लिहिले आहे. न्यूझीलंडचा दिग्गज खेळाडू ऑरेंज आर्मीमध्ये मुख्य प्रशिक्षक म्हणून रुजू होणार आहे.न्यूझीलंडचा अनुभवी खेळाडू डॅनियल व्हिटोरी याने यापूर्वी २०१४ ते २०१८ या कालावधीत विराट कोहलीच्या कर्णधारपदी असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे प्रशिक्षकपद भूषवले आहे. तो संघाचा मुख्य प्रशिक्षक होता. आरसीबीकडून त्याने काही हंगामात संघाचे नेतृत्वही केले.

(AKOLA NEWS NETWORK )

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!
WhatsApp