अकोला न्युज नेटवर्क ब्युरो स्वप्निल सुरवाडे प्रतिनिधी पातूर दिनांक ४ सप्टेंबर :-पातूर : शहरातील भिमनगर येथे आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन एक इसम मृतावस्थेत असल्याचे आज स्थानिकांच्या निदर्शनास आल्याने परिसरात खळबळ उडाली होती.
आज दि. 4/09/2023 रोजी पातूर शहरातील भिमनगर येथे एक इसम आपल्या राहत्या घरात गळफास घेतल्याने मृतावस्थेत असल्याचे तेथील स्थानिकांच्या निदर्शनास आले असता घटनेची माहीती त्यांनी पातूर पोलिसांना दीली.सदर माहितीवरून पातूर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा करून प्राथमिक तपास केला असता मृतकाचे नाव रमेश लक्ष्मण किरतकार (वय 45) रा. भिमनगर, पातूर येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले.

दरम्यान पातूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर शेळके, पो.उ.नि. गजानन पोटे, पो.हे.कॉ.हिम्मत डीगोळे,धर्मेंद्र ठाकूर यांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह खाली काढून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रूग्णालय अकोला येथे पाठविला असून पुढील तपास ठाणेदार किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पातूर पोलिस करीत आहेत.(AKOLA NEWS NETWORK)
