अकोला न्युज नेटवर्क दिनांक १५ जुलै चेतन फुकट प्रतिनिधी आगार:- अकोल्यातील झियान कुरेशी इकबाल कुरेशी या 10 वर्षीय बालकाच्या मृतदेह वाहून जाऊन 72 तास उलटून गेले त्या मुळे सर्वच अकोलेकरांचे लक्ष या प्रकरणा कडे लागले होते अखेर आज सकाळच्या सुमारास शोध पथकला यश आले असून आज अकोला शहरापासून 10 किलोमीटर दूर पाचमोरी जवळील भोळ येथील नदीपात्रात झियान चा मृतदेह आढळून आला.

पावसाळा सुरु होताच अकोला महानगर पालिकेने नाले साफ सफाई अभियान राबविण्याचा गाजावाजा केला पण काम मात्र शून्य प्रमाणात झाल्याने बुधवारी रात्रीच्या पावसात भगतवाडी येथे एक मुलगा नाल्याच्या पाण्यात वाहून गेला नाल्यात गाळ आणी कचरा साचल्या असल्याने रात्री त्या मुलाला शोधण्यात अपयश अखेर आज सकाळी 10 वाजता अकोला अकोट रोडवर या भोळ या ठिकाणी मृतदेह आढळला.

पावसाळा सुरु होताच नाले साफसफाईं करण्यासाठी अकोला महानगर पालिका गाजा वाजा करून काम करते पण अकोल्याची परिस्थिती तुंबल्या सारखीच राहताने परिणामी या प्रकारा मुळे पावसाळ्यात अकोलेकरांना डाबक्यातून मार्ग काढावा लागतो तर काहींचे यामुळे अपघात देखील होतात असाच एक प्रकार बुधवारी रात्री डाबकी रोड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भगतवाडी येथे घडली होती. बुधवार दुपारपासून पावसाने अकोला शहराला झोपडपून काढल्याने सर्वत्र जलमय परिस्थिती निर्माण झाली होती.

खैर मोहम्मद प्लॉट परिसरातील जियान नामक दहा वर्षीय अल्पवयीन मुलगा शरीफ नगर परिसरात खेळत होता. या परिसराला लागूनच एक नाला असून या नाल्यात या मुलाची चप्पल खेळताना गेली. मुलाने क्षणाचाही विलंब न करता नाल्यात एक पाय टाकुन चप्पल काढण्याचा प्रयत्न करताच मुसळधार पावसाने नाल्याला असलेल्या पूरात हा दहा वर्षीय मुलगा वाहून गेल्याची घटना घडली. परिसरातील नागरिकांनी आरडाओरोड सुरू केल्यानंतर जुने शहर पोलीस तसेच मनपाचे अग्निशमन दल घटनास्थळावर दाखल झाले.

या नाल्यात प्रचंड गाळ व कचरा असल्याने तसेच मुसळधार पाऊस सुरू असल्याने या मुलाचा शोध घेण्यास मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. बचाव पथकासह पोलीस व अग्निशमन दल या मुलाचा शोध घेत असतांना तब्बल 72 तासाच्या अथक परिश्रमानंतर अखेर आज सकाळी 10 वाजता मृतक बालक जियान इकबाल कुरेशी याचा मृतदेह अकोला अकोट रोड वरील भोळ येथील नदी पत्रात सकाळी 10 वाजता मिळून आली. अकोट फाईल पोलीस घटनास्थळी पोहचून मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवच्छेदनासाठी अकोला सरोपचार रुग्णालय येथे पाठवण्यात आला. असून या घटनेने अकोला शहरात हळहळ व्यक्त होत आहे.


Share post:

Popular

More like this
Related

सावित्रीच्या लेकींच्या शिक्षणाची वाट सायकलने केली सुकर

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २६ सप्टेंबर २०२३ :-लोणार-शाळेपासून दूर...

जागतिक पर्यटन दिन

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २६ सप्टेंबर २०२३ :-कधी झाली...

विहीरीत उडी घेऊन इसमाची आत्महत्या

अकोला न्युज नेटवर्क डेक्स दिनांक २५ सप्टेंबर २०२३ स्वप्नील...
error: Content is protected !!