अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०९ फेब्रुवारी २०२४:- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ सी वरील काटेपुर्णा नदी पुलावरील बंद करण्यात आलेली अवजड वाहनांची वाहतूक जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी सुरु करण्यास मान्यता दिली आहे. त्याचे आदेश आज जारी करण्यात आले आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ सी या महामार्गावरील काटेपुर्णा नदीवरील पुल क्षतीग्रस्त अवस्थेत असल्यामुळे पुलाच्या दुरुस्तीचे काम पुर्ण होईपर्यंत सर्व प्रकारच्या अवजड वाहतूकीसाठी बंद ठेवण्याचे आदेश होते.
काटेपुर्णा नदीवरील पुलावरुन होणारी सर्व अवजड वाहतूक ट्रक, बसेस, ट्रॅक्टर, ६ चाकी मालवाहतूक गाड्यांची वाहतूक हा महामार्ग बंद असल्यामुळे पर्यायी मार्गावर वाहतूक वळविण्यात आली होती. सद्यस्थितीत या पुलाचे डेक स्लॅबचे काम दुरुस्तीअंतर्गत पूर्ण झाले असून ही वाहतूक ताशी ३० किमी या वेगाने सुरू करण्यास जिल्हादंडाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी आदेशातून मान्यता दिली आहे.