उत्तराखंडच्या केदारनाथ मंदिर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. उत्तराखंडमधील श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने केदारनाथ मंदिर परिसरात मोबाईल वापरावर पूर्णपणे बंदी घातली आहे. मंदिर समितीने केदारनाथ मंदिर परिसरात ठिकठिकाणी सूचना फलक लावण्यात आले असून नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. काही दिवसापूर्वीच मंदिर प्रशासनाने मंदिर परिसरात रिल्स आणि व्हिडीओ बनवण्यास बंदी घातली होती. त्यानंतर आता मंदिर प्रशासनाने मोबाईल फोन संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता केदारनाथ मंदिरात भाविकांना मोबाईल फोन घेऊन जाता येणार नाही.
केदारनाथ मंदिर समितीने मंदिर परिसरात फोन नेण्यावर बंदी घातली आहे. एवढंच नाही तर भाविकांना आता मंदिरात फोटो, रिल्स किंवा व्हिडीओही काढता येणार नाहीत. यासोबतच मंदिर समितीने कपडे घालण्याबाबत नवीन नियम लागू केले आहेत. काही दिवसांपूर्वा केदारनाथ मंदिर परिसरातील काही व्हिडीओ व्हायरल झाले होते, या व्हायरल व्हिडीओमुळे पावित्र्य भंग करत भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने आता मोबाईल फोनला मनाई केली आहे. प्रसिद्ध ब्लॉगर विशाखा केदारनाथ मंदिरासमोर बॉयफ्रेंडला प्रपोज करताना दिसत होती. हा व्हिडीओ समोर आल्यावर यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या. या व्हिडीओमुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या, भाविकांसह नेटकऱ्यांना याचा तीव्र निषेध केला.
मंदिरासमोर प्रपोज केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर केदारनाथ मंदिर समिती अॅक्शन मोडमध्ये आली. यानंतर आधी मंदिर परिसरात व्हिडीओ आणि रिल्स बनवण्यावर बंदी घालण्यात आली. त्यानंतर आता मंदिर प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकत मोबाईल बंदी लागू केली आहे. त्यामुळे आता केदारनाथ मंदिरात भाविकांना मोबाईल फोन घेऊन जाता येणार नाही.