अकोला न्युज नेटवर्क डेक्स दिनांक ४ सप्टेंबर २०२३ :- अकोला : सांगवी मोहाडी गावात बैलजोडी चोरल्याच्या वादातून 60 वर्षीय वृद्धाला जबर मारहाण करण्यात आल्याने वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. याप्रकरणी अकोट फैल पोलिसांनी चौघांविरुद्ध खुनाचे गुन्हे दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली. आज त्यांना न्यायालयासमोर उपस्थीत केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
अकोटफैल पोलिस ठाण्याचे हद्दीतील सांगवी मोहाडी गावात बैल चोरीला गेल्याने देवेंद्र दरेकर नावाच्या 60 वर्षीय वृद्धाला शेजाऱ्यांनी जबर मारहाण केली. या वृद्धाला सदर नागरिक चोराचा पत्ता विचारत होते मात्र त्यांना माहीत नसल्याने ही मारहाण करण्यात आली. यामध्ये जखमी झालेल्या वृद्धाला त्यांच्या मुलाने खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. उपचारानंतर घरी आणल्यानंतर वृद्धाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मयताच्या मुलगा ईश्वर दरेकर याने मारहाणीमुळे वडिलांचा मृत्यू झाल्याची फिर्याद अकोट फैल पोलीस ठाण्यात दिली.
या तक्रारीनंतर अकोट फैल पोलिसांनी मृताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. हा अहवाल सोमवारी आकोटफैल पोलिसांनी मिळताच सांगवी मोहाडी येथील रहिवासी दिनकर वाघ, बाळा तेलगोटे, संतोष जंजाळ, जगन्नाथ तांबखे यांच्याविरुद्ध भादवी कलम 302, 504, 34 अन्वये गुन्हे दाखल केले. चारही आरोपीने अटक करून न्यायालयात हजर केले असता आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे . ही कारवाई अकोटफैल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कडू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जगदीश जायभाये, असलम शेख, प्रशांत इंगळे, गिरीश तिडके, ओमप्रकाश जामणिक, संतोष चिंचोळकर, जितेंद्र कातखेडे, ओम बैदवाड आदींनी केली.