अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ० ४ऑगस्ट २०२३ :-आपल्या अभिनयाने आणि आवाजाने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे किशोर कुमार यांची आज जयंती आहे. किरोश कुमार गायक, पार्श्वगायक, अभिनेता आणि दिग्दर्शक, संगीतकार, निर्माता, पटकथालेखक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. किशोर कुमार जिवंत नसले तरी आजही चाहत्यांच्या मनात त्यांची क्रेझ कायम आहे.किशोर कुमार यांचा जन्म 4 ऑगस्ट 1929 रोजी मध्यप्रदेशात झाला. त्यांनी हिंदीसह, बंगाली, मराठी, आसामी, गुजराती, कन्नड, भोजपुरी, मल्याळम, उर्दू अशा वेगवेगळ्या भाषांमधील गाणी गायली आहेत. किशोर कुमार यांचे खरं नाव आभास कुमार गांगुली आहे. सिनेसृष्टीत पदार्पण केल्यानंतर त्यांनी नाव बदललं.
किशोर कुमार यांना अभिनयक्षेत्रात पदार्पण करायचं नव्हतं…
किशोर कुमार आणि अशोक कुमार एकमेकांचे नातेवाईक आहेत. किशोर कुमार यांनी मनोरंजनसृष्टीत पदार्पण करावं, अशी अशोक कुमार यांची इच्छा होती. पण सुरुवातीला अभिनेत्याने या गोष्टीचा कधीच विचार केला नाही. किशोक कुमार यांनी गायक म्हणून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. ‘बॉम्बे टॉकीज’ या सिनेमासाठी किशोर कुमार यांनी पहिलं गाणं गायलं. तर 1946 मध्ये ‘शिकारी’ या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. या सिनेमात अशोक कुमार महत्त्वाच्या भूमिकेत होते.
किशोर कुमार यांनी त्यांच्या आयुष्यात कधीही मानधनाशिवाय गाणं गायलं नाही. किशोर कुमार यांनी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासाठी 131 गाणी गायली आहेत. यातील 115 गाणी सुपरहिट ठरली आहेत. पण 1980 नंतर किशोर कुमार आणि अमिताभ बच्चन यांची जोडी तुटली. किशोर कुमार यांनी ‘ममती की छांव’ या सिनेमासाठी अमिताभ बच्चन यांना विचारणा केली होती. पण हा सिनेमासाठी करण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी स्पष्ट नकार दिला. त्यामुळे किशोर कुमार नाराज झाले आणि त्यांनी कधीही अमिताभ बच्चन यांच्यासाठी गाणं गायलं नाही.किशोर कुमार यांनी त्यांच्या कारकिर्दीत 16 हजार गाणी गायली आहेत. पण तरीही त्यांचं शेवटचं गाणं रिलीज झालेलं नाही. 2012 मध्ये ‘ओशियन सिनेफॅन ऑक्शन’मध्ये शेवटचं ‘नीलाम’ हे गाणं गायलं. 15 लाख रुपयांत हे गाणं विकलं गेलं. पण त्यानंतरही हे गाणं रिलीज करण्यात आलेलं नाही.
किशोर कुमार यांनी चार लग्न केली. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव रूमा गुहा ठाकुरता असे होते. लग्नानंतर आठ वर्षांनंतर किशोर कुमार आणि रूमा यांचा घटस्फोट झाला. त्यांनतर 1960 साली मधुबाला यांच्यासोबत लग्न केले होते. वयाच्या 35 व्या वर्षी मधुबाला यांचे निधन झालं. त्यानंतर किशोर कुमार यांनी योगिता बाली यांच्या सोबत लग्न केले. लग्नानंतर दोन वर्षांनी किशोर कुमार आणि योगिता यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 1980 मध्ये किशोर कुमार यांनी लीना यांच्यासोबत लग्न केले.