Friday, May 17, 2024
Homeब्रेकिंगबँकेतून निघाली पण…आधी गँगरेप नंतर… मृतदेह बघून पोलिसांही शॉक’

बँकेतून निघाली पण…आधी गँगरेप नंतर… मृतदेह बघून पोलिसांही शॉक’

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ० ४ऑगस्ट २०२३ :-चिपळूण तालूक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका तरूणीचा संशयास्पदरीत्या मृतदेह आढळला होता. या मृतदेहावरून तरूणीची अत्यंत क्रुरपणे हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. कारण तरूणीच्या मृतदेहाच्या डोक्यावरची केस कापण्यात आले होते, भुवय्या देखील कापण्यात आल्या होत्या.जेणेकरून पोलिसांना तिची ओळख पटू नये. तसेच तरूणीवर बलात्कार करून तिचा मृतदेह पाण्यात फेकून देण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. हा संपूर्ण घटनाक्रम पाहून पोलिसांनाही धक्का बसला आहे. पोलिसांनी .या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.चिपळूण तालूक्यातील ओमली येथील रहिवाशी असलेल्या या तरूणीचे नाव नीलिमा चव्हाण आहे. नीलीमा चव्हाण हिच्या संशयास्पद मृत्यूने सध्या संपूर्ण चिपळूण हादरलं आहे. तिची ज्या पद्धतीने क्रुरपणे हत्या करण्यात आली आहे, ते पाहून पोलिसांना सुद्धा घाम फुटला. अत्यंत निर्दयीपणे तिची हत्या करून मृतदेह पाण्यात फेकला होता. पोलिस आता या प्रकरणात आता सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारावर संपूर्ण घटनेचा तपास करत आहे.

निलीमा सुधाकर चव्हाण ही स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या दापोली येथे कार्यरत होती. गेल्या महिन्याच्या शनिवारी 29 जुलै 2023 ला निलीमा चव्हाण दापोलीहून बॅँकेच्या शाखेतून घरी ओमळी चिपळुण येथे येण्यास निघाली होती. या प्रवासा दरम्यान ती वाटेतच बेपत्ता झाली होती. या दरम्यान साधारण दोन दिवस तर तिचा पत्ताचा लागला नव्हता आणि 1 ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजता दाभोळ खाडी येथे तिचा मृतदेह आढळून आला होता.या मृतदेहाच्या डोक्यावरील संपूर्ण केस नष्ट करण्यात आले होते, तिच्या भुवय्या देखील काढण्यात आल्या होत्या. अत्य्ंत वाईट अवस्थेत तिचा मृतदेह आढळला होता. पोलिसही हा प्रकार पाहून चक्रावले होते. मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी आरोपीने हे कृत्य केल्याची माहीती आहे. त्याचसोबत नीलिमावर सामूहिक बलात्कार झाल्याचाही संशय आहे. नीलिमावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा पोलिसांनी संशय आहे.’

दरम्यान पोलिसांनी केलेल्या तपासात दापोलीतून खेड येथील एसटी स्टॅंडच्या सीसीटीव्हीत निलीमा चव्हाण दिसली होती. त्याचसोबत खेडमध्ये एका मुलीबरोबर चिपळूणला जाणाऱ्या गाडीत बसताना देखील सीसीटीव्हीत दिसली होती.या एसटी प्रवासानंतर ती बेपत्ता झाली होती. ती नेमकी कोणत्या बस स्टॅँडवर उतरली आहे, याची देखील माहिती समोर आली नाही आहे. तसेच तिचा मोबाईल नंबर बंद दाखवत होता.तपास यंत्रणेने तिचे मोबाईलचे शेवटचे लोकेशन 29 जुलैच्या रात्री 12.05 वाजता रेल्वेस्टेशन अंजनी येथे दाखवत होते. तेव्हापासून तिचा फोन बंद दाखवत आहे. पोलीस या प्रकरणात अधिक तपास करत आहे.नीलिमा चव्हाण हिची नेमकी हत्या का करण्यात आली आहे, याचे ठोस कारण अदयाप समोर आले नाही आहे. मात्र बदल्याच्या भावनेतून तिच्यासोबत हे कृत्य झाल्याचा संशय आहे. या प्रकरणावरून रत्नागिरी जिल्हा नाभिक समाज आक्रमक झाला आहे. या नाभिक समाजाने या प्रकरणाचा वरिष्ठ यंत्रणा मार्फत कसून तपास करावा, आणि चव्हाण कुटुंबियांना न्याय मिळून द्यावा अशी मागणी केली आहे. तसेच या घटनेचा 12 ऑगस्टपर्यंत तपास न झाल्यास 15 ऑगस्टपासून आमरण उपोषणास बसण्याचा इशारा नाभिक समाजाने दिला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!