अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २७ नोव्हेंबर २०२३ :- रविवारी विविध भागांत मुसळधार पाऊस पडत असल्याने पहायला मिळत आहे. कि रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास जिल्ह्याच्या विविध भागात तसेच अकोला शहरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावलीरात्री उशिरा पर्यंत विजेचा कडकडाट व पाऊस सुरूच होता.
आणि वादळीवाऱ्यासह होत असलेल्या या पावसामुळे कुठे झाडे पडले तर कुठे तसेच शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अकोल्यात मुसळधार पावसाने वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शेकडो क्विंटल कांदा भिजला. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.आणि तसेच शहरातील मुख्य रस्त्यांवर पाणी साचले होते तसेच रस्त्यावरच्या मोठ्या नाल्यांमधील सांडपाणी सखल भागातील रहिवाशी वस्त्यांमध्ये व काही दुकानांमध्ये शिरले. या पावसाने पुन्हा एकदा महापालिका प्रशासनाच्या नालेसफाईची पोलखोल केल्याचे दिसून आले.