अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २९ ऑगस्ट २०२३:-देशभरातील सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मोदी सरकारने सर्वसामान्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. देशातील महागाई कमी व्हावी या अनुषंगाने मोदी सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात मोठी कपात केली आहे.
महागाईने त्रासलेल्या जनतेला केंद्र सरकार मोठा दिला आहे. केंद्र सरकारने घरगुती LPG गॅस सिलेंडरच्या किंमतीत 200 रुपयांनी घट केली आहे. केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरवर 200 रुपयांचं अनुदान जाहीर केलं आहे. हे अनुदान उज्ज्वला योजनेंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना दिलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.(AKOLA NEWS NETWORK)