ANN & GTPL न्युज नेटवर्क ब्युरो दिनांक 23 जुन 2023 शुक्रवार :- Maharashtra Weather Update | राज्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आजपासून (23 जून) राज्यात पावसाची शक्यता हवामान खात्याने (Indian Meteorological Department-IMD) वर्तवली आहे. आजपासून कोकण (Konkan) आणि मध्य महाराष्ट्रात (Madhya Maharashtra) पाऊस सक्रिय होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला होता. त्यानुसार आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र पावसाच्या (Rain) प्रतीक्षेत आहे.

11 जून रोजी कोकणात दाखल झालेल्या मान्सून (Monsoon) वाऱ्यांच्या पुढील हालचालीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. आजपासून कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात (Vidarbha) मान्सूनच्या पावसाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर 24 आणि 25 जूनपासून पावसाचा (Maharashtra Weather Update) जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने (IMD) वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात वाऱ्याच्या स्थितीमुळे मान्सूनची बंगालची शाखा अधिक मजबूत होत आहे. लांबलेल्या पावसामुळे राज्यातील पाणीसाठा तळाला गेला आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यातील शेतकरी (Farmer) अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पावसामुळे शेतकऱ्यांची पिके करपून गेली आहेत. काही ठिकाणी पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिके वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. लवकर पाऊस न झाल्यास पिके वाया जाण्याची शक्यता आहे, काही ठिकाणी पिके वाया गेली आहेत..

75 ते 100 मिमी पाऊस झाल्यानंतरच खरीप पिकांची पेरणी करावी

जून महिना सुरु होताच अनेक शेतकरी बी-बियाणे खरेदी करण्यास सुरवात करतात. यावेळी देखील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केली आहे. पण असे असलं तरीही पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नयेत असे आवाहन कृषी विभागसह तज्ज्ञ करत आहे. मान्सूनचा पेरणीयोग्य पाऊस म्हणजेच 75 ते 100 मिमी पाऊस झाल्यानंतरच खरीप पिकांची पेरणी केली पाहिजे. मात्र अनेकदा शेतकरी थोडाफार पाऊस पडला आणि शेती ओली झाली की लगेच लागवड सुरु करतात.

मात्र पुढे पाऊस न झाल्यास दुबार पेरणीची वेळ येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई न करता योग्य पाऊस झाल्यावरच पेरणी करावी असा सल्ला अभ्यासकांनी दिला आहे. मराठवाड्यात 23 ते 29 जूनदरम्यान पाऊस सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. तर विस्तारित अंदाजानुसार मराठवाड्यात 25 जून ते 1 जुलैदरम्यान कमाल व किमान तापमान सरासरीएवढे असणार आहे. तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे अजूनही मराठवाड्यात मान्सूनचे आगमन झालेलं नाही.


Share post:

Popular

More like this
Related

नीलगायीच्या धडकेत दोन मजूर जखमी !

अकोला न्यूज नेटवर्क राहुल सोनोने प्रतिनिधी वाडेगाव दिनांक ०३...

नितीन गडकरींनी दाखवले मोठे स्वप्न एक दिवस येईल देशात पेट्रोल-डिझेल पंप नसतील

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०३ ऑक्टोबर २०२३ :-हवेत उडणाऱ्या...

घरात अचानक गजानन महाराज प्रगटले? दर्शनासाठी भाविकांची तुफान गर्दी, VIDEO व्हायरल

अकोला न्युज नेटवर्क डेक्स दिनांक ०२ ऑक्टोंबर २०२३ :...

फोनच्या कव्हरमध्ये नोट ठेवण्याची सवय ठरू शकते जीवघेणी !

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०२ ऑक्टोबर २०२३ :-मोबाईल कव्हरमध्ये...
error: Content is protected !!