Sunday, June 16, 2024
Homeताज्या घडामोडीजिल्ह्यात खामगाव, चिखली येथे महासंस्कृती महोत्सव…

जिल्ह्यात खामगाव, चिखली येथे महासंस्कृती महोत्सव…

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०७ फेब्रुवारी २०२४:- जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन राज्यातील संस्कृतीचे आदान-प्रदान पर्यटन व सांस्कृतिक विभाग, जिल्हा प्रशासनाच्या वतीने खामगाव आणि चिखली येथे महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. खामगाव येथे दि. 12 आणि 13 फेब्रुवारी, तर चिखली येथे दि. 20 ते 22 फेब्रुवारी दरम्यान महासंस्कृती महोत्सव होणार आहे. नागरिकांनी या सांस्कृतिक महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

खामगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदानात सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम रंगणार आहे. सोमवार, दि. 12 फेब्रुवारी रोजी संगीत रजनी होणार असून यात राहूल सक्सेना आणि त्यांचा संच मराठी आणि हिंदी गीतांचा कार्यक्रम सादर करतील. मंगळवार, दि. 13 फेब्रुवारी रोजी राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनवर आधारीत महानाट्य ‘निश्चय पूर्तीचा महामेरू’ होणार आहे. तसेच शनिवार, दि. 17 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसहा वाजता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त मॅरेथॉन आणि सकाळी साडेनऊ वाजता रांगोळी स्पर्धा होणार आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी बचतगटांच्या स्टॉल्सच्या माध्यमातून खाद्य संस्कृतीचे आयोजन करण्यात आले आहे.

चिखली येथे तालुका क्रीडा संकुलात मंगळवार, दि. 20 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रमात महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणारा कलाविष्कार महाराष्ट्राचा महानायक अनिरूद्ध जोशी आणि सहकलाकार सादर करणार आहे. बुधवार, दि. 21 फेब्रुवारी रोजी सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या मराठी, हिंदी गाण्यांचा कार्यक्रम नक्षत्रांचे देणे कार्यक्रम सारेगम विजेता ऋषिकेश रानडे, फिल्मफेअर अवार्ड विजेती आनंदी जोशी आणि सहकलाकार सादर करतील. गुरूवार, दि. 22 फेब्रुवारी रोजी जागर लोककलेचा कार्यक्रमात झाडीपट्टी ग्रुप दंडार, नंदकिशोर ग्रुप भारूड, इंगळे आणि सहकारी गोंधळ, पोवाडा, गणेश कदम वासुदेव कला सादर करतील. तसेच नामांकित कलाकारांचे कवि, हास्य संमेलन आणि दिप्ती आहेर यांचा लावणीचा कार्यक्रम सादर करतील. याच ठिकाणी रविवार, दि. 18 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसहा वाजता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त मॅरेथॉन आणि सकाळी साडेनऊ वाजता रांगोळी स्पर्धा होणार आहे.जिल्ह्यात पाच दिवस सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. यातून लोकधारा आणि संस्कृतीचे आदान-प्रदान होणार आहे. तसेच लोककलांचे जतन होणार आहे. नागरिकांनी या सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!