Wednesday, October 9, 2024
Homeताज्या घडामोडीमनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरु काय आहेत मागण्या पाहा

मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरु काय आहेत मागण्या पाहा

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक १० फेब्रुवारी २०२४:- मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरु केले आहे. त्यांनी सगेसोयरे अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर करण्याची प्रमुख मागणी केली आहे. त्यासाठी येत्या एक ते दोन दिवसात विशेष अधिवेशन बोलावून सगेसोयरे अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर करावे अशी मागणी केली आहे.

तसेच सरकारने मराठा आंदोलकांवर गुन्हे अद्यापही मागे घेतलेले नसल्याचे निदर्शनास आणून देऊन तातडीने गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे. मनोज जरांगे यांचे हे तिसरे उपोषण आहे. गेल्यावेळी त्यांनी 20 जानेवारीला आंतरवाली सराटीतून ‘चलो मुंबई’चा नारा देत लाँग मार्च काढला होता.

त्यानंतर लाखो मराठा बांधव नवीमुंबई आणि आझाद मैदानात जमले होते. मुंबईच्या वेशीवर नवीमुंबईत हे आंदोलन अडवून सरकारने ज्या लोकांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी सगेसोयऱ्यांचे अध्यादेशाचा मसुदा काढला होता. या अधिसूचनेवर सरकारने आता 16 फेब्रुवारीपर्यंत हरकती आणि सूचना मागविल्या आहेत. ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी या सगेसोयरे नोटीफिकेशनला विरोध केला आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण न देता स्वतंत्रपणे द्यावे अशी त्यांची मागणी आहे. त्यामुळे त्यांनी सगेसोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या नोटीफिकेशनला कोर्टात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!
WhatsApp