अकोला न्यूज नेटवर्क दिनांक १९ जुलै :– भारतीय रेल्वे ट्रान्सपोर्टचे एक मोठे साधन आहे. प्रवासी ट्रेनमध्ये आरामात ट्रॅव्हल करु शकतात. सर्व सुविधा लक्षात घेता रेल्वेने प्रवाशांसाठी साहित्य नेण्याविषयीचे काही नियम बनवले आहेत.
प्रवासी एका मर्यादेपर्यंतच साहित्य घेऊन जाऊ शकतात. मात्र रेल्वेच्या या निमांविषयी खूप कमी लोकांना माहिती असते. ज्यामुळे अनेकदा लोकांना ट्रेनमध्ये असुविधेचा सामना सलावा लागतो. लिमिटपेक्षा जास्त साहित्य घेऊन गेल्याने भाडं लागतं. एवढंच नाही तर केस किंवा दंडही लावला जाऊ शकतो. प्रवाशांनी जास्त सामान घेऊन प्रवास करू नये, अशी माहिती रेल्वे मंत्रालयाने आपल्या एका ट्विटमध्ये दिली आहे. प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून मर्यादित सामान घेऊनच प्रवास करा. ट्रेनमध्ये स्लीपर ते एसी कोचपर्यंत किती सामान नेले जाऊ शकते ते आम्ही तुम्हाला सांगतो.
प्रवाशांना सामान नेण्याचे नियम माहित असले पाहिजेत.
Indian Railway: ट्रेन तिकीट कॅन्सल केल्यावर मिळवा फूल रिफंड, अनेक प्रवाशांना माहिती नसतील त्यांचे अधिकार!
किती सामान घेऊन जाता येते ट्रेनमध्ये प्रवास करताना, प्रवासी जास्तीत जास्त 50 किलो सामान सोबत ठेवू शकतो. यापेक्षा जास्त सामान असल्यास प्रवाशांना भाडे द्यावे लागते. त्यासाठी वेगळे तिकीट काढावे लागेल. तुम्ही एसी कोचमधून प्रवास करत असाल तर यासाठी नियम वेगळा आहे. एसी कोचमध्ये कोणतेही शुल्क न भरता 70 किलोपर्यंतचे सामान सहजपणे नेले जाऊ शकते. तर, स्लीपर कोचमध्ये एक व्यक्ती फक्त 40 किलो सामान सोबत ठेवू शकते.
Indian Railway: देशातील अनोखे रेल्वे स्टेशन!
जिथे तिकिटासोबत लागतो व्हिसा आणि पासपोर्ट, पण का? सामानाच्या आकाराबाबतही आहेत नियम ट्रेनमध्ये प्रवास करताना मोठ्या आकाराच्या सामानासाठीही वेगळे नियम आहेत. जर प्रवाशांनी मोठ्या आकाराचे सामान सोबत नेले तर त्यांना किमान 30 रुपये शुल्क द्यावे लागेल. त्याचबरोबर निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त सामान असल्यास प्रवाशांना दीडपट जास्त चार्ज द्यावे लागते. वैद्यकीय वस्तूंसाठीही आहेत नियम प्रवाशासोबत रुग्णही प्रवास करत असतील तर रुग्णाला लागणाऱ्या सामानासाठी रेल्वेचे वेगळे नियम आहेत. या नियमानुसार, डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रवासी ऑक्सिजन सिलिंडर आणि स्टँड घेऊन जाऊ शकतात.