Saturday, April 13, 2024
Homeताज्या घडामोडीViral Video: मॉक ड्रील सुरु असताना, दहशवाद्याची भुमिका करणाऱ्याला नागरिकांनी दिला चोप...

Viral Video: मॉक ड्रील सुरु असताना, दहशवाद्याची भुमिका करणाऱ्याला नागरिकांनी दिला चोप (Watch Video)

अकोला न्युज नेटवर्क ब्युरो डेक्स दिनांक ८ ऑगस्ट २०२३ :- महाराष्ट्रातील धुळे येथील एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. धुळे पोलीसांच मॉक ड्रिल चालू असताना दशहवाद्याच्या भुमिकेत बसलेल्या व्यक्तीला नागरिकांनी चांगला चोप दिला आहे. धुळ्यातील स्वामीनारायण मंदीरात दहशतवादी घुसल्याचे जवळील रहिवाशांना समजले. परिसरात दहशवादाची घटना समजताच सर्वींकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर हा प्रकार समजून आला. परिसरात भीतीचे वातावरण पसरवल्यामुळे भडकलेल्या नागरिकांनी दहशतवाद बनलेल्या व्यक्तीला चोप दिला. त्यानंतर ही घटना पोलीसांच्या लक्षात आली आणि पोलीसांनी चोप देणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. हा सर्व प्रकार कॅमेरात कैद करण्यात आले आहे.

अनेकदा पोलीस विविध गोष्टींवर मॉक ड्रील करून तयारींची चाचपणी करत असतात. असेच एक दहशतवादी हल्ल्याचे मॉक ड्रिल पोलिसांच्या चांगलचे अंगलट आले आहे. तो खोटा दहशतवादी एका नागरिकाला ओलीस ठेवून वातावरण निर्मिती करत असताना संतापलेल्या एका नागरिकाने त्याला चांगलाच चोप दिला आहे. याचा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे.

धुळे शहरातील देवपूर भागात असलेल्या श्री स्वामीनारायण मंदिरात दहशतवादी शिरले असल्याचा फोन पोलीस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षात आला. यानंतर तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दहशतवाद्यांना ताब्यात घेतल्याचा थरार यावेळी धुळेकरांनी अनुभवला. मात्र हे पोलिसांचे मॉक ड्रिल असल्याचे समजताच नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र यावेळी दहशतवाद्याची भूमिका करणाऱ्या व्यक्तीलाच एका नागरिकाने चोप दिल्याचा प्रकार घडला. यावेळी चोप देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी लागलीच ताब्यात घेतले.

फोन पोलीस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षात वाजला नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांनी पोलीस यंत्रणेला सतर्क केले. काही वेळातच शहरातून सायरन वाजवत पोलिसांची वाहने मंदिराजवळ पोहोचली. मंदिर परिसरात यावेळी एकच धावपळ उडाली. मंदिरात शिरलेल्या दहशतवाद्यांना पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेऊन चौघा भाविकांची सुखरूप सुटका केली. हा सगळा थरार धुळेकर नागरिकांनी काल सायंकाळी अनुभवला. परंतू, या दहशतवादी नाटकामुळे मुले रडत आहेत, नागरिक घाबरले आहेत, या कारणामुळे एका नागरिकाने त्या दहशतवाद्यावरच हात उगारले. दोन-तीन कानशीलातही लगावल्या.

हा प्रकार ज्यावेळी घडला त्यावेळी स्वामीनारायण मंदिराच्या कॅन्टीन परिसरात नागरिक कुटुंबीय समवेत बसले असताना दहशतवादी आत शिरताच त्यांनी केलेल्या बंदुकीच्या फायरिंग च्या आवाजामुळे काही महिला आणि लहान मुले प्रचंड घाबरली होती, यामुळे या संतप्त झालेल्या नागरिकाने दहशतवाद्याची भूमिका करणाऱ्यालाच चोप दिला.

या चोप देणाऱ्या नागरिकाला पोलिसांनी लागलीच ताब्यात घेत हे ट्रेनिंगचा एक भाग असल्याचे सांगत ताब्यात घेतले, असे ऋषिकेश रेड्डी उपविभागीय पोलीस अधिकारी, धुळे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!