अकोला न्युज नेटवर्क दिनांक २२ जुलै :- विकासाचा गवगवा करणारे लोकप्रतिनिधी हे पावसाने तोंडावर पाडले असून आज दिवसभर सुरु असलेल्या पावसाने रस्त्यावर साचलेल्या पाण्यात डाबकी रोड वासियांना वाट काढावी लागत असल्याने संतप्त झालेल्या ठाकरे गटाने भर पावसात आणि गुडघ्यापर्यंत असलेल्या पाण्यात महानगरपालिका प्रशासन विरोधात नारबाजी केली
अकोला शहरात काल रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील अनेक सकल भागात पावसाचं पाणी साचलं आहेय..शहरातील डाबकी रोड परिसरात काही दिवसांपूर्वी आलेल्या पावसामुळे पाणी अनेक घरात शिरलं होतं,यामुळे मोठा नुकसान सुद्धा झाला होत… तर कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे डाबकी रोड भागातील मुख्य रस्त्यांवर पावसाचा पाणी साचलं आहेय.. या पाण्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन आपली वाहन या रस्त्यावरून चालावे लागत आहेय.. नालेसफाई न झाल्याचा आरोप करीत उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी डाबकी रोडवर नारे बाजी करत आंदोलन केलं.. शिवसैनिकांनी भर पावसात आणि गुडघ्यापर्यंत असलेल्या पाण्यात महानगरपालिका प्रशासन विरोधात नारबाजी केली..