Tuesday, May 21, 2024
Homeताज्या घडामोडीआता बीएसएनएल देणार अतिदुर्गम भागात नेटवर्क

आता बीएसएनएल देणार अतिदुर्गम भागात नेटवर्क

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २९ जुलै २०२३:-सातत्याने नॉट रिचेबलचा ठपका बसलेल्या बीएसएनएलने आता कात टाकण्यास सुरुवात केली असून, ४- जी सेवा देण्यास कंबर कसली आहे. यात देशभरात तब्बल २४ हजार तर राज्यातील ग्रामीण भागात दोन हजार ४-जीचे बीटीएस टॉवर उभारण्यात येणार असून लवकरच दुर्गम भागात बीएसएनएलच्या मोबाईलची रिंग वाजणार असल्याची माहिती भारत संचार निगम लिमिटेडचे महाराष्ट्र-गोवा प्रांताचे मुख्य महाप्रबंधक रोहित शर्मा यांनी दिली.

छत्रपती संभाजीनगर विभागाचा आढावा घेण्यासाठी शर्मा आले होते. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, देशभरात बीएसएनएलने ४- जी सेवेत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार देशाने स्वतः तयार केलेली ४-जीची यंत्रणा विकसित केली असून, यात ग्राहकांना उत्तम सेवा देण्याचा निर्धार केला आहे. या सेवेअंतर्गत देशातील जिथे कोणतेच सिग्नल आणि ऑपरेटर नाहीत अशा ठिकाणी बीएसएनएलची टॉवर्स उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या टॉवर्समुळे त्या गानांतील नागरिकांना बीएसएनएलद्वारे सेवा पुरवण्यात येणार आहे. यात राज्यात अतिदुर्गम भागातील गावांमध्ये २ हजार बीएसएनएल ४ जी बी.टी.एस टॉवर उभारण्याचे लक्ष्य ठेवले असून, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात-१६, जालना जिल्ह्यात-१९, आणि बुलढाणा जिल्ह्यातील ४४ दुर्गम भागातील गावांमध्ये टॉवर उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!