अकोला न्युज नेटवर्क दिनांक २४ जुलै :- अकोला जिल्हा परिषदेच्या नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी यांनी आपला पदभार स्वीकारला आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील विभाग प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी यांनी त्यांचे स्वागत केले आहे
तत्कालीन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी आपल्या कार्यकाळात चांगलाच विकासात्मक दृष्टिकोन आणि काटेकोरपणे प्रशासकीय यंत्रणा चालवली आहे यांची बदली अमरावती जिल्हाधिकारी पदी झाली असून ते रुजू झाले आहे आता अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर श्रीमती वैष्णवी यांनी आपला पदभार सांभाळला असून आता प्रशासकीय यंत्रणा आणि गाव पातळीवरच्या विकास याकडे यांची विशेषता समोर दिसून येणार आहे अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या पदाचा पदभार सांभाळतात श्रीमती वैष्णवी बी यांचा जिल्हा परिषदेतील प्रत्येक विभागातील विभाग प्रमुख अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आहे तसेच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ संगीता ताई अढाऊ यांनीही नवनियुक्त जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी यांचे स्वागत करून ग्राम पातळीवरील विकासात्मक नियोजनात्मक चर्चा केली आहे