अकोला न्युज नेटवर्क दिनांक २४ फेब्रुवारी २०२४ :- ग्रामीण पत्रकार संघाने आपल्या नवीन कार्यकारिणीची घोषणा केली आहे. तालुकाध्यक्ष म्हणून नरेंद्र जगन्नाथजी कोंडे, सचिवपदी देवानंद आग्रे आणि कार्याध्यक्षपदी अरुण काकड यांची अविरोध निवड झाली आहे. या निवडीची प्रक्रिया अकोट येथील ठाकुरवाडी लोहारी रोडवर 21 फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या आढावा बैठकीत पार पडली.
या बैठकीत मागील कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला आणि नव्या कार्यकारिणीची गठन प्रक्रिया चर्चेतून पार पडली. युवा पत्रकार नरेंद्र कोंडे यांची तालुकाध्यक्ष म्हणून निवड झाल्याने संघटनेत नवीन उत्साहाची लाट आली आहे. देवानंद आग्रे आणि अरुण काकड यांची निवड सुद्धा सर्वानुमते झाली, ज्यामुळे संघटनेच्या कार्याला नवीन दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.
बैठकीत पत्रकार संघातील इतर पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांची संस्थेवरील निवडीबद्दल सत्कार करण्यात आला. यात संघटनेचे जिल्हाध्यक्ष अँड नरेंद्रजी बेलसरे, सौ. स्वाती वैभव गुजरकर, सौ. रुपाली देवानंद आग्रे, निलेशजी झाडे आणि सौ. सुनिता अरुण काकड यांचा समावेश होता.
ग्रामीण पत्रकार संघाच्या आढावा बैठकीत राज्याध्यक्ष गजाननराव वाघमारे, राज्यसचिव राजेशजी डांगटे, सहसचिव अविनाशजी राठोड व राज्य प्रवक्ते अनंतराव गावंडे यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. या आढावा बैठकीला उपस्थित सर्वांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून संघटना मजबूत करण्याची आणि सामाजिक कार्यक्रम राबवण्याची प्रेरणा दिली. या बैठकीत उपस्थित सर्वांनी नव्या कार्यकारिणीच्या यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आणि संघटनेच्या उद्देशांना प्राप्त करण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली.