Wednesday, May 22, 2024
Homeतंत्रज्ञानआता चुकलात तरी No Problem WhatsApp ने लॉन्च केले नवीन फिचार

आता चुकलात तरी No Problem WhatsApp ने लॉन्च केले नवीन फिचार

ANN अकोला नेटवर्क ब्युरो दि. 22 जुन :- WhatsApp Edit Feature Launch : आता तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप मेसेज एडिट करु शकणार आहात. कारण व्हॉट्सअ‍ॅप मेसेज एडिट फीचर लॉन्च करण्यात आले आहे. आत्तापर्यंत यूजर्सला एरर मेसेज डिलीट करुन तो पुन्हा टाइप करावा लागत होता.

बऱ्याचदा आपण एखाद्या व्यक्तीला व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवल्यानंतर त्यामध्ये स्पेलिंग किंवा इतर काहीतरी चूक झालेली लक्षात येते. मग आपण आणि पुढे सुधारित मेसेज लिहून परत नवा मेसेज म्हणून ते पाठवतो. मात्र आता हे करण्याची गरज उरणार नसून व्हॉट्सॲप स्वतः मेसेज एडिट करण्याची सोय उपलब्ध करून देत आहे!

तुम्ही मेसेजमध्ये चूक केल्यास किंवा तुमचा विचार बदलल्यास तुम्ही आता पाठवलेले संदेश संपादित करू शकता. ही सोय तुम्हाला शब्दलेखन त्रुटी दूर करण्यास किंवा तुमच्या संदेशांमध्ये संदर्भ जोडण्याची परवानगी देते.

पाठवेलेल्या मेसेजवर लॉंग प्रेस करा.

Edit वर टॅप करा

आता सुधारित मेसेज टाइप करा आणि पाठवा

एखादा मेसेज पाठवल्यावर १५ मिनिटांपर्यंतच आपल्याला एडिटचा पर्याय असेल. शिवाय एडिट केलेल्या मेसेजसमोर Edited असं लेबलसुद्धा दिसेल. मात्र एडिट करण्याच्या आधी तो मेसेज काय होता हे दिसणार नाही. ही सोय हळूहळू जगभरातील वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होत आहे. येत्या आठवड्यात सर्वांना उपलब्ध होईल.

व्हॉट्सॲपने अलीकडे नव्या सोयी जोडण्याचा धडाकाच लावला आहे. काही दिवसांपूर्वीच चॅट लॉक करण्याचा पर्याय आला होता. त्याआधी एकापेक्षा अधिक फोन्सवर एकच व्हॉट्सॲप अकाऊंट वापरता येण्याची सोय आली आहे!

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!