Sunday, September 15, 2024
Homeताज्या घडामोडीपातूर पंचायत समितीचे नविन गटविकास अधिकारी पदावर रुजू

पातूर पंचायत समितीचे नविन गटविकास अधिकारी पदावर रुजू

अकोला न्यूज नेटवर्क स्वप्निल सुरवाडे प्रतिनिधी पातुर दिनांक १७ जानेवारी २०२४ :-पातूर :अकोला जिल्ह्यातील सर्वात क्लिष्ट समजल्या जाणाऱ्या पातूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी म्हणून आज नविन अधिकारी पदावर रुजू झाले आहेत.पातूर पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी अगर्ते साहेब यांनी प्रभार स्विकारुन जेमतेम काळच लोटला असता येथील स्थानिक राजकारणामुळे कामाचा ताण नं झेपल्याने त्यांनी आजारी रजा टाकल्यामुळे सदर पद रिक्त होते.त्यामुळे पंचायत समितीच्या सर्वच विभागाचे काम रखडले होते.त्यामुळे आज दि.१७ जानेवारी रोजी मूर्तिजापूर येथे सहाय्यक गटविकास अधिकारी असलेले सुभाष काळे यांनी पातूर पंचायत समितीच्या प्रभारी गटविकास अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला असून

पंचायत समितीच्या सर्व अधिकारी,कर्मचारी यांची औपचारिक भेट घेऊन ओळख करून घेतली. यावेळी पातूर पंचायत समितीचे यु.एन.घुले,कपिल पवार,वसंत चव्हाण,नितीन जोशी,दिनकर घुगे,गणेश बागडे,ओम पुरी यांनी नव्याने रुजू झालेल्या गटविकास अधिकारी सुभाष काळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

स्थानिक राजकारणाने गढूळ झालेल्या पातूर पंचायत समितीमध्ये भ्रष्टाचारामध्ये जिल्हाभरात नावलौकिक मिळविले असून येथे अक्षरशः जंगलराज सुरू आहे.जिल्ह्यातील सर्वात क्लिष्ट समजल्या जाणाऱ्या या पंचायत समितीमध्ये नव्याने रुजू झालेले गटविकास अधिकारी काही बदल घडवतील की प्रवाहात सामील होऊन जंगलराजचा भाग बनतील याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष आहे.(akola ann news network)

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!
WhatsApp