ANN & GTPL न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक 9 जुलै (माना प्रतिनिधी उद्धव कोकणे) – अकोला जिल्ह्यात काल सायंकाळ पासून वादळी वाऱ्यासह पावसाला सुरवात झाली. आणी यात घराची भिंत कोसळून एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. शहरात तर पाऊस सुरूच होता पण ग्रामीण भागात देखील पावसाची सततधार सुरु असल्याने पावसामुळे नुकसान व जीवित हानी होण्यास सुरवात झाली आहे.
पावसाळा सुरु होताच जीर्ण झालेली घरे, इमारती ह्या अधिक धोकादायक होत असून सतत पडणाऱ्या पावसाने ह्याच घरामुळे जीवित हानी देखील होते अशीच एक घटना माना पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नवसाळ या गावात घडली. माना येथून जवळच असलेल्या नवसाळ येथील 75 वर्षीय वृद्ध महिलेचा आपल्या राहत्या घराची भिंत कोसळल्याने मृत्यू झाल्याची घटना 9 जुलै च्या मध्य रात्री दोन ते तीन वाजताच्या सुमारास घडली.
मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार नवसाळ येथील लिलाबाई जानराव रोकडे वय 75 वर्ष राहणार नवसाळ येथील महिलाही घरात गाढ झोप येत असताना अचानक रात्री आलेल्या पावसामुळे व घराची भिंत अतिशय जीर्ण असल्यामुळे ही भिंत लिलाबाई जानराव रोकडे हिच्या अंगावर पडून तिचा जागीच मृत्यू झाला. सकाळी त्यांना भिंतीखाली दबलेल्या अवस्थेत बाहेर काढण्यात आले.
परंतु ती महिला मृत पावलेली नागरिकांना दिसली. यावरून नवसाळ येथील नागरिकांनी माना पोलीस स्टेशनला फोन करून सदर माहिती माना पोलिसांना सांगितली. घटनास्थळी तात्काळ माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरज सुरवसे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पुढील तपास ठाणेदार सुरज सुरवसे यांचे मार्गदर्शनाखाली तेजराव तायडे हे तपास करीत आहे.