अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०४ ऑगस्ट २०२३ :-हेडलाईन नागोली फाट्याजवळ स्विफ्ट डिझायर टायर फुटल्याने टू व्हीलर चालक जाग्यावर ठार, एक जण किरकोळ जखमी.अँकर मुर्तीजापुर तालुक्यातील ग्राम नागोली येथील रहिवासी गौतम अंभोरे वय 50 वर्ष यांचा अमरावती वरून येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एम एच थर्टी 29 31 चा टायर फुटल्यामुळे गाडीचे संतुलन गेल्याने चालू टू व्हीलर या गाडीवर गाडी गेल्यामुळे त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.
त्यांना मुर्तीजापुर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात आणले डॉक्टरांनी त्यांना मृत्यू घोषित केले.तसेच या अपघातात रोडच्या कडेला उभे असलेले असलेले प्रकाश गवई हे सुद्धा किरकोळ जखमी झाले आहेत. मुर्तीजापुर ग्रामीण पोलीस स्टेशन ठाणेदार सुरेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली विजय मानकर, सुदाम धुळगूंडे तपास करीत आहे. रिपोर्टर धनराज सपकाळ कॅमेरामन नरेंद्र वाढोनकर लोकेशन मुर्तीजापुर