अकोला न्युज नेटवर्क दिनांक २४ जुलै :- शेगाव मध्ये आज सोनियाचा दिवस पंढरपूर आषाढी वारी नंतर आज पालखी शेगाव येथे दाखल विदर्भ पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव येथील गजानन महाराजांच्या पालखीचा परतीचा प्रवास पूर्ण झाला असून आज पालखी संत नगरीं शेगाव येथे पोहोचली असता भाविकांची मांदियाळी आज पाहायला मिळाली.
विदर्भाची पंढरी प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणारे संत नगरी शेगांव मध्ये भाविकांची मांदियाळी आज पाहायला मिळाली. दोन महिन्याच्या आषाढी वारी करतात गेलेल्या श्री चे पालखी च हे 54 वर्ष आणि आज पंढरपूर वारी नंतर शेगाव मध्ये दाखल झाली आहे. काल रात्री आपल्या शेवटच्या खामगाव मुकामा नंतर सकाळी चार वाजता शेगाव करता रवाना झाली. यासोबत दरवर्षी वाढत जाणारी भाविकांची संख्या यावर्षी लक्षणीय जवळपास लाखापेक्षा जास्त भावीक खामगाव ते शेगाव करता 16 किलोमीटरच्या सहभाग घेत असतात. महिला, बाल ,वृद्ध या सर्वांचा यात समावेश असतो. डोळ्याचा पारन फेडणार हे दृश्य पाहून परिसर मंत्रमुग्ध होऊन जातो. जवळपास सकाळी साडेदहा वाजता च्या दरम्यान शेगावत श्री चे पालखी शहरात आगमन झाले. दोन तासाच्या विश्रामानंतर पालखीची नगर परिक्रमा सुरू करत शहरातील मुख्य मार्गाने भाविकांच्या स्वागताने पालखी संध्याकाळी मंदिरात दाखल होऊन या पालखी सोहळ्याचा समारोप सोहळा पार पडला या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आज लाखो भाविक एक गर्दी केली होती. एकंदरीत दोन महिन्याच्या प्रदीर्घ पायी दिंडीचे हरिनामाचा जप ,भजन, कीर्तन रिंगण सोहळा ने मंदिर परिसरात सांगत होते.