अकोला न्यूज नेटवर्क स्वप्निल सुरवाडे प्रतिनिधी पातुर दिनांक १६ ऑक्टोंबर २०२३ :- पातूर ते वाशिम रोडस्थित असलेल्या पातूर घाटात रोडचे काम करीत असलेल्या मजुराला एका दुचाकीची जोरदार धडक झाल्याने दुचाकीस्वार ठार झाला असून एक गंभीर जखमी तसेच रोडचे काम करीत असलेल्या मजुरासही गंभीर ईजा झाल्याची घटना घडली आहे.
पातूर पासून वाशिमकडे जाताना सुमारे ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या पातूर घाटात आज दि.१६/१०/२०२३ रोजी दुपारी सुमारे दीड वाजताच्या दरम्यान मोंन्टेकारलो कंपनीचा मजूर रोडवर काम करीत असताना अकोल्याकडून हिंगोलीला जात असलेल्या दुचाकी क्रमांक एम.एच ३० बी एस ६२७१ सदर मजुरास जोरदार धडक दिली यात अभिषेक संतोष खाडे (वय १९) रा.खडकी दुचाकीस्वार हा जागीच ठार झाला महेश बबनराव घुगे रा.हिंगोली हे गंभीर जखमी झाले रस्त्याचे काम करीत असलेल्या मजुराला देखील गंभीर ईजा झाली असून वृत्त लिहिस्तोवर जखमी मजुराचे नाव समजू शकले नाही.
सदर घटनेची माहिती मिळताच पातूर पोलीस स्टेशनचे ट्रॅफिक जमादार ठाकूर,चिकटे मेजर,पोलीस चालक अनिल अंभोरे,पचपोर मेजर,दिगोडे मेजर,अभिजित आसोलकर,पत्रकार दुले खान यांनी जखमीस पुढील उपचारासाठी अकोला येथे रवाना केले व सदर मृतकास शवविच्छेदनाकरिता सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे पाठविले असून पुढील कारवाई पातूर पोलीस करीत आहेत.