Thursday, May 23, 2024
Homeमनोरंजनओये होये! कुत्रा दोन म्हशींवर स्वार, एकदम अजय देवगण स्टाईल

ओये होये! कुत्रा दोन म्हशींवर स्वार, एकदम अजय देवगण स्टाईल

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ३१ जुलै२०२३ :-अजय देवगणच्या रूपात नवा ॲक्शन हिरो मिळाला. दोन बाईकमध्ये उभं राहण्याचा लोकप्रिय स्टंट करताना अजयच्या स्फोटक एन्ट्रीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. हा लोकप्रिय स्टंट आजही अनेकांच्या स्मरणात आहे. गोलमाल चित्रपटातही अजयने हा लोकप्रिय स्टंट पुन्हा केला होता.बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने 1991 मध्ये ‘फूल और कांटे’ या चित्रपटाद्वारे पदार्पण केले होते, ज्यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. चित्रपटाच्या उत्कृष्ट कथानकाचे खूप कौतुक झाले आणि गाणी हिट झाली, तर बी-टाऊनला अजय देवगणच्या रूपात नवा ॲक्शन हिरो मिळाला. दोन बाईकमध्ये उभं राहण्याचा लोकप्रिय स्टंट करताना अजयच्या स्फोटक एन्ट्रीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. हा लोकप्रिय स्टंट आजही अनेकांच्या स्मरणात आहे. गोलमाल चित्रपटातही अजयने हा लोकप्रिय स्टंट पुन्हा केला होता.

अजय देवगण स्टाईलने कुत्रा म्हशींवर स्वार
असाच एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय ज्यात एक कुत्रा अजय देवगण स्टाईलने दोन म्हशींवर स्वार झालाय. हा व्हिडीओ बघून तुम्हाला खूप हसू येईल. कुत्रा ज्या पद्धतीने म्हशींवर स्वार आहे आणि ज्या स्टाईलने हे रस्त्यावरून जातायत ते बघण्यासारखं आहे. बघताना वाटतं हा कुत्रा अजय देवगणचा फॅन आहे. कुत्र्याचा बॅलन्स तर इतका छान आहे दोन म्हशी सरळ एकत्र चालत असताना कुत्रा म्हशीवर उभा असल्याचे दिसून येते. अजय देवगणचा हा पॉप्युलर स्टंट एक कुत्रा सुद्धा करतोय.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!