Monday, May 20, 2024
Homeताज्या घडामोडीपातूर पंचायत समिती मध्ये कर्मचाऱ्यांचा खूपच भ्रष्टाचार

पातूर पंचायत समिती मध्ये कर्मचाऱ्यांचा खूपच भ्रष्टाचार

अकोला न्यूज नेटवर्क गुलाब अंभोरे प्रतिनिधी पातूर दिनांक ०३ फेब्रुवारी २०२४:- तालुका पातुर जिल्हा अकोला प. स. पातूर या ठिकाणी तेथील कर्मचाऱ्यांचा खूपच भ्रष्टाचार दिसून येत आहे. प. स. मधून माहिती अधिकारि अर्ज, घरकुल फाईल गहाळ होतात. चोरले जातात, पंचायत समितीच्या यांत्रेनेमधून अर्ज गहाळ कसे होतात हे गांभीर याची बाब आहे. पंचायत समिती BDO यांच्या अंडर मध्ये चालते. आणि तेथील कक्ष अधिकारि असतो याची आवक जावक मध्ये वाच असते.

तसेच सहाय्यक प्रशासन अधिकारी यांच्या जबाबदारी शिवाय कोणताच अर्ज बाहेर जात नाही. दिनांक – 18 – 1- 24 ला एका व्यक्तीने माहितीचा अधिकार हा अर्ज पातूर पंचायत समिती दाखल केला होता. अर्जाची O.C. आणि आवक जवक रजिस्टर मध्ये नोंद आहे. दिनांक 2- 2 – 24 ला अर्जाची कामा ची विचार पुश केली असता आवक कक्ष, घरकुल ऑपरेटर आतिश पवार तसेच कक्ष सहाय्यक किशोर बर्डे, तसेच सहाय्यक प्रशासन अधिकारी घुले साहेब, आणि BDO अगर्ते साहेब यानी अर्जाचा तपास केला असता गहाळ असलेला अर्ज मिळाला नाही. पातूर पंचायत समिती मधील वीवरा ग्रामपंचायत मधील चाललेला भ्रष्टाचार, वारंवार घरकुल ची लिस्ट बदलणे, लिस्ट मधून गरीब लोक वगळणे, पैसे घेऊन पंचायत समिती ला फाईल पाठवणे घरकुळची जियो टकींग न करणे, असा ग्रामपंचायती पासुन तर पंचायत समिती परेंत असा भ्रष्टाचार आहे. हा भ्रष्टाचार थांबवायला पाहिजे. गहाळ केलेला अर्जाचा विचार केल्याशिवाय पुढील घरकुल आणि हप्ते थांबविण्यात येतील ही सर्व जबाब दरी BDO ची आहे. तसेच संबंधित अधिकारी यांनी या कडे गांभीर्याने लक्ष द्यावे. आणि हा भ्रष्टाचार थांबवावं.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!