अकोला न्यूज नेटवर्क दिनांक १८ ऑगस्ट २०२३:-रेशन कार्डसाठी ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर सध्याच्या कार्यपद्धतीनुसार तपासणी होऊन योजनेच्या प्रकारानुसार ऑनलाइन ई- रेशन कार्ड उपलब्ध करून दिले जाणार आहे.हे रेशन कार्ड संबंधित लाभार्थ्याला पुरवठा विभागाच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येईल.यामध्ये अन्न सुरक्षा योजना, राज्य योजनेच्या रेशन कार्डधारकांचा समावेश आहे.यामुळे एजंटांचा त्रास कमी होऊन मोफत कार्ड उपलब्ध होणार आहे. अर्जदारांनी शिधापत्रिकेसाठी ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर प्रचलित कार्यपद्धतीनुसार तपासणी करून योजनेच्या प्रकारानुसार ऑनलाइन रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यात येईल. अर्जदारास संकेतस्थळावरून ई-रेशन कार्ड डाऊनलोड करता येईल.

प्रत्येकाला ई-रेशन कार्ड
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या अत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना व राज्य योजनेच्या एपीएल शेतकरी,राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेव्यतिरिक्त रेशन कार्डधारक अशा सर्व रेशन कार्डधारकांना आता ऑनलाइन सेवेद्वारे ई-रेशन कार्ड सुविधा निःशुल्क उपलब्ध होणार आहे. कोणत्याही रेशन कार्डधारकाने ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्याच्या अर्जाची तपासणी केली जाईल. पात्र ठरणाऱ्या रेशन कार्डधारकाला या योजनेनुसार ऑनलाइन रेशन कार्ड देण्यात येईल.

९ हजार जणांना मिळाले कार्ड
पुणे शहरात ई-रेशन कार्ड १७ मेपासून देण्यात सुरुवात झाली आहे. त्यानुसार आतापर्यंत ८ हजार ९२१ पुणेकरानी है रेशन कार्ड ऑनलाइनरीत्या मिळवले आहेत.

शहरात ३ लाख रेशन कार्डधारक
शहरात अन्न पुरवठाचे ११ विभाग आहेत. त्यात ३ लाख ३५ हजार ३०७ रेशन कार्ड आहेत. या रेशन कार्डाचा लाभ १२ लाख ५६ हजार १५४ सदस्यांना होत आहे राज्य सरकारकडून आता ई-रेशन कार्ड मिळणार आहे. ते ऑनलाइन अर्ज करून उपलब्ध होतील. मोबाइल, संगणक किया लॅपटॉपवर हे रेशन कार्ड कोणालाही डाऊनलोड करून ठेवता येणार आहे. गरज पडल्यास त्याची प्रिंटही घेऊ शकेल. विशेष म्हणजे या ई-रेशन कार्डसाठी पैसे लागणार नाहीत,(AKOLA NEWS NETWORK )


Share post:

Popular

More like this
Related

नीलगायीच्या धडकेत दोन मजूर जखमी !

अकोला न्यूज नेटवर्क राहुल सोनोने प्रतिनिधी वाडेगाव दिनांक ०३...

नितीन गडकरींनी दाखवले मोठे स्वप्न एक दिवस येईल देशात पेट्रोल-डिझेल पंप नसतील

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०३ ऑक्टोबर २०२३ :-हवेत उडणाऱ्या...

घरात अचानक गजानन महाराज प्रगटले? दर्शनासाठी भाविकांची तुफान गर्दी, VIDEO व्हायरल

अकोला न्युज नेटवर्क डेक्स दिनांक ०२ ऑक्टोंबर २०२३ :...

फोनच्या कव्हरमध्ये नोट ठेवण्याची सवय ठरू शकते जीवघेणी !

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०२ ऑक्टोबर २०२३ :-मोबाईल कव्हरमध्ये...
error: Content is protected !!