अकोला न्यूज नेटवर्क स्वप्निल सुरवाडे प्रतिनिधी बोर्डी दिनांक १६ ऑगस्ट २०२३:- पातूर शहरातील नागरिकांच्या पाळीव बकऱ्या चोरी जाण्याचे प्रमाण एरवी खूप वाढले असून नुकतेच पातूर शहरात लागोपाठ सात बकऱ्या चोरी झाल्याची घटना घडली असून बकरी चोरट्यांच्या हौदोसामुळे शहरासह ग्रामीण भागातील गुरेंपालक चिंताग्रस्त झाले आहेत.
सदर चोरीच्या घटनेत पातूर येथील पत्रकार दुले खान युसूफ खान यांचा बोकूड किंमत 15000 रुपये तसेच सैय्यद पुरा येथील रहिवासी उमेरोद्दीन यांच्या 2 बकऱ्या किंमत 20000 हजार, सुमेरोद्दीन यांच्या 2 बकऱ्या किंमत 25000 रुपये व सलाबत प्लॉट येथील निवासी सय्यद काझीम यांच्या 18000 रुपये किंमत असलेल्या 2 बकऱ्या असे एकूण 78 रुपये किंमत असलेले एक बोकूड व सहा बकऱ्यांची चोरी अज्ञात चोरट्यांनी केली असून फिर्यादी दुले खान युसुफ खान यांच्या तक्रारी वरून अज्ञात चोरट्या विरुद्ध अप.क्र. 395/2023 कलम 379 भादंवि नुसार पातूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर घटनेबाबत अधिक तपास पातूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनात ए.एस.आय.दिलीप मोडक करीत आहेत.