ANN & GTPL न्यूज नेटवर्क दिनांक मंगळवार २७ जून २०२३ स्वप्नील सुरवाडे प्रतिनिधी पातूर : पत्रकार लोकशाहीचाच नाही तर माणुसकीचा देखील ठरला आधारस्तंभ म्हटले जाते याची प्रचिती आज दिनांक मंगळवार २७ जून २०२३ पातूर येथे पाहायला मिळाली पातूर घाटात आज सकाळी अंदाजे 10 वाजताच्या दरम्यान एका इसमाने विष प्राशन केलेले असल्याची माहिती पातूर येथील पत्रकार स्वप्निल सुरवाडे यांना मिळाली असता सदरची माहिती ठाणेदार हरीश गवळी यांना दिली असता पातूर पोलिसांनी तत्काळ पोलीस जीपने पत्रकार स्वप्निल सुरवाडे, पत्रकार दुले खान,पातूर पोलीस स्टेशनचे तारासिंग राठोड मेजर,आठवले मेजर,केकन मेजर यांनी घाटात शोध घेतला असता सदर इसम हा घाटात 20 फूट खाली विष पिऊन तडपत असल्याचे दिसले.यावेळी समयसूचकता बाळगून त्यांनी सदर इसमास 20 फुट खोल दरीतून वर उचलून आणले व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी आणले.

यावेळी पातूर आरोग्य केंद्र येथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून सदर इसमास पुढील उपचाराकरिता अकोला येथे हलविण्यात आले.हा इसम वाडेगाव येथील रहिवासी असल्याचे समजले असून आत्महत्येचा प्रयत्न करण्याचे ठोस कारण अजून समोर आले नसून पातूर पोलीस अधिक तपास करीत आहेत. आज घडलेल्या घटनेबाबत मी पत्रकार स्वप्निल सुरवाडे व पत्रकार दुले खान यांनी क्षणाचाही विलंब नं लावता पातूर पोलिसांच्या मदतीने घटनास्थळ शोधून सदर इसमास वेळेवर उपचार करण्यासाठी मदत करून प्राण वाचवले.

पातूर येथील पत्रकार दुले खान,स्वप्निल सुरवाडे,निशांत गवई हे नेहमीच कुठेही अपघात झाल्यास सर्वप्रथम जखमींना उपचारासाठी मदत करीत असतात अशा निस्वार्थी सेवा देणाऱ्या पत्रकारांचे तसेच घटनेचे गांभीर्य ओळखून तत्परता दाखवणाऱ्या पातूर पोलिसांचे कौतुक करावे तेवढे कमीच ! त्यांच्या प्रयत्नाने आज पुन्हा एक जीव वाचला असून पत्रकार केवळ बातमीच देत नसून सामाजिक कार्यात देखील अग्रेसर असून केवळ पत्रकार केवळ लोकशाहीचाच नाही तर माणुसकीचा देखील आधारस्तंभ आहे हे यावरून सिद्ध होते.


Share post:

Popular

More like this
Related

नीलगायीच्या धडकेत दोन मजूर जखमी !

अकोला न्यूज नेटवर्क राहुल सोनोने प्रतिनिधी वाडेगाव दिनांक ०३...

नितीन गडकरींनी दाखवले मोठे स्वप्न एक दिवस येईल देशात पेट्रोल-डिझेल पंप नसतील

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०३ ऑक्टोबर २०२३ :-हवेत उडणाऱ्या...

घरात अचानक गजानन महाराज प्रगटले? दर्शनासाठी भाविकांची तुफान गर्दी, VIDEO व्हायरल

अकोला न्युज नेटवर्क डेक्स दिनांक ०२ ऑक्टोंबर २०२३ :...

फोनच्या कव्हरमध्ये नोट ठेवण्याची सवय ठरू शकते जीवघेणी !

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०२ ऑक्टोबर २०२३ :-मोबाईल कव्हरमध्ये...
error: Content is protected !!