Tuesday, May 28, 2024
Homeताज्या घडामोडीपंढरीची वारी ठरली अखेरची वारी अकोला येथील वारकऱ्यांची वाटेतच प्राणज्योत मालवली

पंढरीची वारी ठरली अखेरची वारी अकोला येथील वारकऱ्यांची वाटेतच प्राणज्योत मालवली

ANN & GTPL न्युज नेटवर्क ब्युरो दिनांक 1 जुलै 2023 अनुराग अभंग अकोला प्रतिनिधी :- अकोला जिल्ह्यातील वारकऱ्यांसाठी पंढरपूर ते अकोला या धावत्या बसमध्ये हृदयविकाराचा झटका आल्याने एका वारकरऱ्याचा मृत्यू झाला. पंढरीची वारी करुन घराकडे परतत असताना वारकऱ्याची प्राणज्योत मालवलीय. वारकऱ्याच्या मृत्यूनं अकोल्यामध्ये शोककळा पसरली आहे.

ही घटना परभणीच्या गंगाखेड येथे बस पोहोचल्यावर उघडकीस आलीय. नरेंद्र अनंतराव कळणे असे मृत वारकऱ्याचं नाव आहे. नरेंद्र अनंतराव कळणे हे अकोला शहरातील डाबकी रोड भागातील सरस्वती नगर येथील रहिवासी होते. आषाढीच्या दिवशी विठुरायाचे दर्शन करून परतताना नरेंद्र अनंतराव कळणे यांचा मृत्यू झाला. वारकऱ्याला हृदयविकाराचा झटका आल्याच समजताच गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

विठुरायाचे दर्शन करण्यासाठी आषाढी एकादशी निमित्त हजारो वारकरी पंढरपूरमध्ये दाखल होतात. वारकरी नरेंद्र कळणे हे एम एच 40 सीएम 3520 या क्रमांकाच्या बसने पंढरपूरवरून अकोला जिल्ह्याकडे निघाले होते. बस परभणीच्या गंगाखेड रोडवरील धैर्य मंगल कार्यालयाजवळ आली असताना वारकरी चहापाणासाठी खाली उतरले होते. मात्र बसमधील सर्व वारकरी हे खाली उतरलेले असताना नरेंद्र अनंतराव कळणे हे बसमध्येच बसले होते. त्यानंतर बसमधल्या इतर वारकरी कळणे यांना नाष्टा चहापाण्याची विचारपूस करण्यासाठी बसमध्ये चढले. मात्र नरेंद्र अनंतराव कळणे हे काहीच प्रतिसाद देत नसल्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर बसचालकाने बस थेट गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणलं. मात्र तिथे असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नरेंद्र कळणे यांना तपासून मृत घोषित केले. कळणे यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्या असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!