ANN अकोला नेटवर्क ब्युरो दि. सोमवार 12 जुन स्वप्नील सुरवाडे प्रतिनिधी पातूर :- पातूर येथे बावन्न पानांच्या हरजीत जुगार अड्डयावर पोलिसांनी धाड टाकून एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींवर कारवाई केली.

आज दि. 13 जूनच्या सायंकाळी पातूर येथील अकोला- वाशिम रस्त्यावर नवीनच बनलेल्या बायपास पुलाजवळ रस्त्याच्या कडेला 52 पानांचा पैशाने हारजित वर जुगार खेळला जात असल्याची गुप्त माहिती पातूर पोलीस स्टेशनचे डे ऑफिसर तारासिंग राठोड यांना मिळाली असता सदर माहितीवरून पातूर पोलिसांनी संपळा रचून या जुगार अड्डयावर धाड टाकली

पातूर पोलीस स्टेशनचे पो.उ.नि. गजानन पोटे यांच्या फिर्यादीवरून आरोपी १).शे.अलिम (वय 22 वर्ष), २).शे.साजीद शे.याकूब (वय 24 वर्ष), ३).बबलू खान रूम खान (वय 22 वर्ष) रा.मोमीन पुरा, पातूर यांचेवर अप.क्र.278/23 कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार अधिनियम अनुसार कारवाई केली मात्र कारवाई दरम्यान आरोपी शे.साजीद शे.याकूब व बबलू खान रूम खान हे दोघे घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले

या कारवाईत पत्त्यांच्या डावातील 1,330 रुपये व नगद 1000 रुपये असे मिळून 2,330 रुपयांची नगद रक्कम तसेच 10,000 रुपये किंमतीचा एक मोबाईल,स्प्लेंडर प्रो – मोटारसायकल क्रमांक MH 30 AQ 2559 किंमत 50,000 रुपये, हिरो स्प्लेंडर क्र. MH 30 BK 7535 किंमत 50,000 रुपये, हिरो डीलक्स क्र. MH 30 BK 4685 किंमत 40,000 रुपये असा एकूण 1,52,330 असा मुद्देमाल जप्त केला.

सदर कारवाई पातूर पोलीस स्टेशनचे पो. उ. नि. गजानन पोटे, तारासिंग राठोड, दिलीप इंगळे, हिम्मत डीगोळे, अजय ठाकूर, वसीमोद्दीन इस्माईलोद्दीन, मनोजसिंग ठाकूर यांनी केली.


Share post:

Popular

More like this
Related

नीलगायीच्या धडकेत दोन मजूर जखमी !

अकोला न्यूज नेटवर्क राहुल सोनोने प्रतिनिधी वाडेगाव दिनांक ०३...

नितीन गडकरींनी दाखवले मोठे स्वप्न एक दिवस येईल देशात पेट्रोल-डिझेल पंप नसतील

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०३ ऑक्टोबर २०२३ :-हवेत उडणाऱ्या...

घरात अचानक गजानन महाराज प्रगटले? दर्शनासाठी भाविकांची तुफान गर्दी, VIDEO व्हायरल

अकोला न्युज नेटवर्क डेक्स दिनांक ०२ ऑक्टोंबर २०२३ :...

फोनच्या कव्हरमध्ये नोट ठेवण्याची सवय ठरू शकते जीवघेणी !

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०२ ऑक्टोबर २०२३ :-मोबाईल कव्हरमध्ये...
error: Content is protected !!