अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०३ ऑगस्ट २०२३ :-हिवरखेड येथील पोलीस कर्मचारी श्रीकृष्ण सोळंके यांचा 16 वर्षीय अल्पवयीन मुलगा यश हा एकाच महिन्यात दुसऱ्यांदा घरून निघून गेला व बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
हकीकत अशा प्रकारे आहे की हिवरखेड येथील पोलीस कर्मचारी श्रीकृष्ण सोळंके राहणार पोलीस स्टेशन वसाहत हिवरखेड यांचा 16 वर्षीय अल्पवयीन मुलगा यश हा काॅलेजला जातो असे सांगून घरुन गुलाबी रंगाची लेडीज सायकल व शाळेची बॅग घेऊन दि 1ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता घरुन निघुन गेला तो शाळेत गेलाच नाही तो कोठेतरी निघून गेला आहे.
असे निदर्शनास आल्यानंतर कुटुंबीयांनी व मित्र परिवारांनी दोन दिवस त्याचा सर्वत्र शोध घेतला परंतु यश कुठेही मिळून आल्यामुळे शेवटी त्याच्या वडील पोलीस कॉन्स्टेबल श्रीकृष्ण सोळंके यांनी हिवरखेड पोलीस स्टेशनला दि 3 ऑगस्ट रोजी फिर्याद दिली आहे.फिर्यादी पो.हे.काॅ. श्रीकृष्ण फुलचंद सोळंके यांच्या फिर्यादीवरून हिवरखेड पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 363 नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
यश हा काही दिवसांपूर्वी सुद्धा घरून निघून बेपत्ता झाला होता. त्याचा बराच शोध घेतल्यानंतर तो शेगाव येथे मिळून आला होता. आता तो पुन्हा घरून निघून बेपत्ता झालेला आहे. फोटोमध्ये दिसत असलेला मुलगा यश हा कोणालाही मिळून आल्यास अथवा दिसल्यास तात्काळ पोलीस स्टेशन हिवरखेड रुपराव ता तेल्हारा जि अकोला येथे अथवा त्याचे वडील श्रीकृष्ण सोळंके यांच्याशी मोबाईल क्रमांक 750 740 16 30 वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.