Saturday, January 18, 2025
Homeराजकीयमहाराष्ट्रात राजकीय भूकंप :महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप:शिवसेनेनंतर राष्ट्रवादी फुटली, अजित पवार महाराष्ट्राचे...

महाराष्ट्रात राजकीय भूकंप :महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप:शिवसेनेनंतर राष्ट्रवादी फुटली, अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, राजभवनावर घेतली शपथ,

ANN & GTPL न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक 2 जुलै 2023 :-महाराष्ट्राच्या राजकारणात आज पुन्हा भूकंप होण्याची शक्यता आहे. अजित पवार आपल्या काही समर्थक आमदारांसह राजभवनात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील राजभवनात दाखल झाले आहेत. अजित पवार आज शिंदे सरकारमध्ये सामील होणार असून मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवार यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे छगन भुजबळ आणि इतर आमदारही मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

अजित पवार मुख्यमंत्री की उपमुख्यमंत्री?

महत्त्वाचे म्हणजे मंत्रिमंडळ विस्तार होणार असेल तर आमची संपूर्ण तयारी झाली आहे, अशी महत्त्वाची माहिती राजभवनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आज राष्ट्रवादीच्या नेत्यांची शपथविधी होण्याच्या शक्यतांच्या चर्चांना उधाण आले आहे. आज दुपारी दोन वाजता मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून त्यात मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचा शपथविधी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. राष्ट्रवादीचे 54 पैकी 30 आमदार अजित पवारांसोबत आहेत. त्यामुळे शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडल्याचे दिसत आहे.

दरम्यान, अजित पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारही मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीला दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, किरण लहमाटे, नीलेश लंके, धनंजय मुंडे, रामराजे निंबाळकर, दौलत दरोडा, मकरंद पाटील अतुल बेनके, सुनील टिंगरे, अमोल मिटकरी, अदिती तटकरे, शेखर निकम, निलय नाईक, अशोक पवार, अनिल पाटील, सरोज अहिरे आदी उपस्थित होते. राष्ट्रवादीचे हे सर्व नेते सरकारमध्ये सामील होणार असल्याचे बोलले जात आहे.

सुप्रिया सुळेंनी घातली समजूत

सुत्रांची माहिती आहे. सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना समजवायचा प्रयत्न केला. पण अजित पवार ऐकायला तयार नव्हते.

प्रफुल्ल पटेल केंद्रात?

सुत्रांची माहिती आहे. सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना समजवायचा प्रयत्न केला. पण अजित पवार ऐकायला तयार नव्हते. महत्त्वाचे म्हणजे शरद पवारांचे विश्वासू प्रफुल्ल पटेल व छगन भुजबळही शिंदे गट-भाजपसोबत सरकारमध्ये सामील होत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, प्रफुल्ल पटेल यांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार मंत्रिपदाचही शपथ घेणार आहेत. यात काही ज्येष्ठ नेत्यांसह नव्या आमदारांचा समावेश आहे. यात दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, निलेश लंके, धनंजय मुंडे, दौलत दरोडा, अदिती तटकरे, इंद्रनील नाईक यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत…

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!
WhatsApp