Saturday, September 14, 2024
Homeराजकीयअजितदादांच्या बंडात शरद पवारांचाही हात? उद्या सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्यास आश्चर्य...

अजितदादांच्या बंडात शरद पवारांचाही हात? उद्या सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्यास आश्चर्य वाटणार नाही- राज ठाकरे

ANN & GTPL न्युज नेटवर्क ब्युरो :- अजित पवारांच्या बंडाशी माझा संबंध नाही, असे शरद पवार म्हणत असले तरी मला तसे वाटत नाही. उद्या शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे या केंद्रात मंत्री झाल्या तर मला तरी आश्चर्य वाटणार नाही, असे परखड मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

शरद पवारांचे निकटवर्तीय असणारे दिलीप वळसे-पाटील, प्रफुल्ल पटेल हे काही असेच भाजपसोबत सत्तेत जाणार नाही, असे म्हणत अजित पवारांच्या बंडात शरद पवारांचाही हात असल्याचा संशय राज ठाकरेंनी व्यक्त केला आहे.

हा सर्व एक ड्रामा

आज पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी अजित पवारांच्या बंडावर भूमिका मांडली. राज ठाकरे म्हणाले, उद्धव ठाकरेंचे ओझे उतरवण्यासाठी शरद पवारांनी खेळलेली ही खेळी असू शकते. आता शरद पवार काहीही म्हणतो की बंडाशी माझा काही संबंध नाही. मात्र, मला तसे वाटत नाही. शरद पवारांचे अत्यंत विश्वासू दिलीप वळसे-पाटील, प्रफुल्ल पटेल हे असेच शरद पवारांना सोडून जाणार नाही. उद्या रातोरात सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्यास मला तरी आश्चर्य वाटणार नाही. हा सगळा एक ड्रामा आहे.

👆🏼फोटोवर क्लिक करवून कमेंट मध्ये नोंदवा तुमचे मत 👆🏼

स्वार्थासाठी वाट्टेल ती तडजोड

राज ठाकरे म्हणाले, अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीने महाराष्ट्रात केवळ राजकीय ड्रामा सुरू झाला आहे. आता शत्रू कोण, मित्र कोण? हे ओळखणेही कठीण झाले आहे. सध्या कोणत्याही राजकीय पक्षाला मतदारांशी काही देणेघेणे नाही. मतदारांनाही आपण यांना का मतदान केले, याचा विसर पडला असले. केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी वाट्टेल ती तडजोड केली जात आहे. याबाबत आता लोकांनीच विचार करणे गरजेचे आहे.

लवकरच महाराष्ट्राचा दौरा

राज ठाकरे म्हणाले, पुढील काही दिवसांत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा मेळावा होत आहे. यात मी राज्यात चालू असलेल्या राजकीय चिखलफेकीवर सविस्तर बोलणार आहे. तसेच, लवकरच महाराष्ट्राचा दौराही करणार आहे. मला महाराष्ट्राच्या जनतेशीही बोलायचे आहे. तेव्हाच मी यावर सविस्तर भूमिका मांडेल.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!
WhatsApp