Wednesday, May 22, 2024
Homeक्राईमAI च्या मदतीने तरुणींचा अश्लील VIDEO:पोलिस अधिकाऱ्याची 2 मुले अटकेत, राज्यातील ही...

AI च्या मदतीने तरुणींचा अश्लील VIDEO:पोलिस अधिकाऱ्याची 2 मुले अटकेत, राज्यातील ही अशी पहिली घटना

अकोला न्युज नेटवर्क ब्युरो दिनांक २४ ऑगस्ट :- आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या (AI ) मदतीने 2 तरुणांनी तरुणींचा अश्लील व्हिडिओ तयार केल्याची संतापजनक घटना पालघरमध्ये घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणातील दोन्ही आरोपी पोलिस अधिकाऱ्याची मुले आहेत.

सोशल मीडियावर शेअर केला व्हिडिओ

गत काही वर्षांपासून एआय तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढला आहे. त्यात या तंत्रज्ञानाचा गैरवापरही तेवढाच वाढला आहे. कहर म्हणजे पालघरमधील एका पोलिस अधिकाऱ्याच्या 2 मुलांनी एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने 2 तरुणी व महिलांचे अश्लील व्हिडिओ तयार केले. ते एवढ्यावरच थांबले नाही. त्यांनी हे व्हिडिओ थेट सोशल मीडियावर शेअर केले.

आरोपींनी तरुणींना केली मारहाण

हा प्रकार समजल्यानंतर पीडित तरुणींनी आरोपींचा विरोध केला. पण आरोपींनी शिरजोरी करत त्यांनाच मारहाण केली. त्यानंतर तरुणींनी थेट पोलिसांकडे धाव घेऊन आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

वडील मुंबई पोलिसांत कार्यरत

पालघर पोलिसांच्या माहितीनुसार, आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या मदतीने अश्लील व्हिडिओ तयार करण्याची ही पहिलीच घटना घडली आहे. आरोपींचे वय 19 व 21 वर्षे आहे. त्यांचे वडील मुंबई पोलिसांत कार्यरत आहेत, असे अर्नाळा सागरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कल्याण करपे यांनी याविषयी बोलताना सांगितले.

तरुणींचे फोटो वापरून गैरकृत्य

यासंबंधीच्या वृत्तानुसार, आरोपी तरुणांनी महिला व तरुणींच्या फोटोंमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूलचा वापर करून अश्लील व्हिडिओ तयार केले. त्यांच्या कृत्याचा बळी पडलेल्या दोन्ही तरुणींनी यासंबंधी आरोपींकडे विचारणा केली असता, आरोपींनी त्यांना मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी पॉस्को अंतर्गतही गुन्हा दाखल केला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!