Saturday, April 13, 2024
Homeताज्या घडामोडीनितेश राणे 'वेडा आमदार, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नये- प्रकाश आंबेडकर

नितेश राणे ‘वेडा आमदार, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नये- प्रकाश आंबेडकर

अकोला न्युज नेटवर्क दिनांक २३ फेब्रुवारी २०२४ :- भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पोलिसांवरील केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.नितेश राणेंच्या वक्तव्याला फार महत्त्व देऊ नये, असे म्हणत आंबेडकरांनी त्यांचा उल्लेख ‘वेडा आमदार’ असा केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे फार काही फरक पडणार नाही, असे देखील आंबेडकर म्हणाले.ते अकोला येथे बोलत होते.

काय म्हणाले होते नितेश राणे
अकोला येथे एका कार्यक्रमात बोलताना भाजपचे आमदार नितेश राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. पोलिस आमच्या राज्यात आमच्यावर काय करणार? त्यांना जागेवर रहायचे आहे की नाही? ते माझ्या भाषणाचे चित्रीकरण करून केवळ बायकोला दाखवू शकतील. पोलिस माझे काहीही बिघडवू शकत नाहीत, असे वक्तव्य राणे यांनी केले होते.

नितेश राणेंच्या या वक्तव्यावर आज प्रकाश आंबेडकर यांना विचारले असता ते म्हणाले, त्यांच्या वक्तव्यामुळे काही फरक पडणार नाही. पोलिसांनी आणि जनतेनेही त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नये, असे सांगत आंबेडकरांनी नितेश राणे यांचा उल्लेख ‘वेडा आमदार’ असा केला. त्यांनी केलेल्या वक्तव्यावर कारवाई होऊ शकते. पण माझ्या मते पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष करावे. एक वेडा आमदार बोलला असे समजावे. त्याच्या या वक्तव्यामुळे समाजावर कोणताही परिणाम होणार नाही, असे ही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

मनोहर जोशींच्या निधनावर दु:ख
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे. ते अकोला इथं बोलत होते. ‘रिडल्स’च्या वेळेस राज्यात जो वाद निर्माण झाला त्यावेळी मनोहर जोशींनी अतिशय संयंतपणे हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केल्याचे आंबेडकर म्हणाले आहेय. यासोबतच लोकसभेत सभापती असताना अनेक निकराचे प्रसंग त्यांनी हसत-खेळत सहजपणे निभावून नेल्याचंही आंबेडकर म्हणाले आहे.दरम्यान, वाशिम जिल्ह्यातील कारंजा चे भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांच्या निधनावरही प्रकाश आंबेडकरांनी दुःख व्यक्त केलंय. अनेक वर्षांपासून मैत्री असलेला एक मित्र आपण गमावल्याची भावना यावेळी आंबेडकरांनी व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!