अकोला न्यूज नेटवर्क,प्रतिनिधी सागर भलतीलक बोर्डी, दि.17 जुलै :- स्थानिक रोटरी नेत्र रुग्णालय येथे नुकताच पदग्रहण सोहळा संपन्न झाला त्या मध्ये 53 वे अध्यक्ष म्हणुन दिपक कतोरे व सचिव पदी संतोष इस्तापे यांनी पदभार सांभाळला. सर्वप्रथम मावळते अध्यक्ष माधव काळे यांनी मागील वर्षाचा विस्तृत अहवाल सादर केला. सर्व सदस्यांचे कौतुक व आभार व्यक्त करत, सदस्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
संपुर्ण व महास्ट्रात फक्त् अकोट व मालेगांव येथे रोटरीचे स्वत:चे नेत्ररुग्णालय कार्यरत असुन दर पंधरा दिवसानंतर नेत्र शल्य् चिकीत्सा नियमित प्रमाणे केले जातात. व बाहयरुग्ण तपासणी दररोज नियमित केली जाते. हया वर्षीचे अध्यक्ष दिपक कतोरे हे सफल व्यवसायी तथा समाजीक कार्यकर्ते असुन ते अनेक सामाजीक संस्थेशी जुळलेले आहेत त्यांच्याशी बोलतांना अनेक समाज उपयोगी प्रकल्प् हया वर्षी घेण्याचा मानस जसे नेत्रदान अवयव दान,रक्तदान, वृक्षारोपण, रोगनिदान शिबीरे,रस्ता सुरक्षा सप्ताह ,योग शिबीर,गरीब विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके वाटप, जल संवर्धन प्रकल्प तथा रोटरी नेत्र रुग्णलयातील सर्व सुवीधा निशी सुसज्य् करण्याचा मानस त्यांचा अध्यक्षीय कार्य काळात पुर्ण करण्याचा निर्णय अध्यक्ष व सचिव यांच्याशी बोलतांना व्यक्त केला. हया वेळी मंचावर प्रमुख पाहुणे सुरेशभाऊ व्यवहारे, पदग्रहण अधिकारी असिस्टंट गव्हर्नर आनंदजी दशपुते, मावळते सचिव नंदकिशोर शेगोकार उपस्थित होते.
असिस्टंट गव्हर्नर आनंद दशपुते यांनी वर्षभर वेळोवेळी मदत करण्याचे आश्वासन देत सुरु असलेल्या रोटरीच्या कार्याचे कौतुक केले ह्या वेळी रोटरी चे माजी अध्यक्ष रविभाऊ मुंडगावकर, प्रमोदजी लहाने,चंद्रकांतजी अग्रवाल, दिलीप भाई चावडा , उद्धवराव गणगणे, संजय बोरोडे , अविभाऊ गणोरकर,शाम शर्मा,शिरीष पोटे सदस्य श्याम पिंपळे,आनंद भोरे,अशोकभाई गट्टाणी, रवी पवार, संदीप भुस्कट, रोटरी चे असिस्टंट गव्हर्नर अतुलजी कोल्हे,अमरावती उपस्थीत होते. कार्यक्रमाचे संचालन रोटरी चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव राजकुमारजी गांधी व व आभार रोटरीचे सचिव संतोष इस्तापे यांनी केले अशी माहीती अकोट रोटरीचे जनसंपर्क अधीकारी नंदकिशोर शेगोकार कळवितात.