Tuesday, May 28, 2024
Homeमनोरंजन"झुकेगा नई साला" अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' ने प्रदर्शनापूर्वीच केला मोठा विक्रम

“झुकेगा नई साला” अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ ने प्रदर्शनापूर्वीच केला मोठा विक्रम

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक डेक्स दिनांक १३ ऑगस्ट २०२३ :- पुष्पा अभिनेता अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने मोठी कमाई केली होती. या चित्रपटातील सर्व पात्रांची भूमिका आणि डायलॉगने प्रेक्षकांची मन जिंकली होती. यानंतर आता चाहते ‘पुष्पा 2’ ची आतुरतेने वाट पाहात आहेत. मात्र प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने नवा विक्रम केला आहे.

पुष्पा 2 च्या मेकर्सनं सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ‘आयकॉन अल्लूची झलक तुम्हाला वेडं केल्याशिवाय राहणार नाही’, असे कॅप्शन मेकर्सने या पोस्टला दिले आहे. अल्लूच्या या फोटोला सात मिलियन पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहे. त्यावरुन त्याची आणि पुष्पाच्या सिक्वेलची लोकप्रियता दिसून येत आहे. इनस्टाग्रामवर सात मिलियनपेक्षा जास्त लाईक्स मिळणारा पहिला भारतीय चित्रपटाचे हे पोस्टर ठरले आहे. मेकर्सने सोशल मीडियाद्वारे ही माहिती शेअर केली आहे.

अल्लू अर्जुनचा फर्स्ट लूक पोस्टर 7 एप्रिल रोजी रिलीज झाला होता. पुष्पा 2 मध्ये अल्लू अर्जुन पुन्हा एकदा पुष्पराजच्या भूमिकेत दिसणार आहे. सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटात रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती Mythri Movie Makers ने केली असून हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!