अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २८ जुलै २०२३:-भाजपचे राज्यसभेतील खासदार नरेश बंसल यांनी देशाचे ‘इंडिया’ हे नाव हटवून केवळ ‘भारत’च ठेवण्याची मागणी केली आहे.खासदार बंसल म्हणाले की, हे वर्ष स्वातंत्र्याचे अमृत वर्ष म्हणजे देशाचा अमृत काळ चालू आहे. त्यामुळे राज्यघटनेच्या कलम १ मध्ये संशोधन करून देशाचे नाव केवळ ‘भारत’ ठेवण्यात यावे. मागील स्वातंत्र्यादिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण करतांना गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्ती देण्याचे म्हटले होते. वसाहतवादाच्या मानसिकतेतून मुक्ती मिळवण्याची आवश्यकता आहे. त्याठिकाणी भारतीय मूल्ये आणि विचार यांना लागू करण्याची आवश्यकता आहे.