अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ० ४ऑगस्ट २०२३ :-चाऱ्याच्या बरोबरीने पावसाळ्यात डोंगराळ भागातील गवत जनावरांच्या चाऱ्यासाठी उपलब्ध असते. या गवतामध्ये पाण्याचा अंश ८० ते ८५ टक्यापर्यंत असतो. जास्त पाणी असलेला चारा तसेच पावसाळयानंतर उगवलेला कोवळा लशुलुशीस गवत जनावरांनी अति प्रमाणात खाल्ल्यास अपचन, पोटफुगी, हागवण यासारखी लक्षणे दिसून येतात. हे टाळण्यासाठी जनावरांना थोडा वाळलेला चारा खाऊ घालावा. हिरव्या चाऱ्याबरोबर मोठ्या जनावरांना ५ ते ७ किलो वाळलेला १४ चारा व शेळ्या-मेंढयासाठी १/२ ते १ किलो वाळलेला चारा दिल्यास अपचन होणार नाही. त्याचबरोबर त्यांच्या दुधातील स्निग्धाशांचे प्रमाण ही टिकून राहिल.

चरायला जाणाऱ्या जनांवराच्या बाबतीत विशेषत: मेंढ्या व शेळ्या यांच्यासाठी पावसाळ्यातील चरण्याच्या वेळा पावसाच्या अंदाजाने बदलाव्यात, त्यामुळे जनावरांना श्वसनसंस्थेचे व पचनसंस्थेचे आजार होण्याचे टाळता येईल. पावसाळयामध्ये कधीकधी जनावरांना आपल्या शरीराचे तापमान टिकवून ठेवण्यासाठी जास्त उष्माकांची (उर्जा) गरज भासते, ती भागविण्यासाठी जनावरांच्या आहारात स्निग्धपदार्थाचा उदा. तेलबियांच्या पेंडी जसे शेंगदाणा पेंड, सरकी पेंड इत्यादीचा समावेश करावा, म्हणजे जनावराची उत्पादन क्षमता टिकवून ठेवता येईल.जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती, उत्पादकता व प्रजोत्पादन क्षमता वाढविणेसाठी हिरव्या व वाळलेल्या चाऱ्याबरोबर संतुलित खुराक जनावरांना देणे महत्वाचे आहे. बाजारातून तयार पशुखाद्य विकत घेणे परवडत नसल्यास घरच्या घरी सुध्दा खुराक तयार करता येईल. यासाठी खाद्य मिश्रणात पेंड किंवा ढेप २५ ते -३५% वारी, बाजरी, मका २५ ते ३५%, गहु किंवा तांदळाचा – कोंडा १० ते २५%, दाळ चुणी -५ ते २०% या मिश्रणातील – घटकांचे प्रमाण जनावराच्या आवश्यकतेनुसार व खाद्य पदार्थांच्या उपलब्धतेनुसार बदलावे. या खुराकात १% खनिज मिश्रण पावडर व १ ते २% खाण्याचे मीठ मिसळावे.

दुधातील कमी फॅट
पावसाळ्यामध्ये भरपुर प्रमाणात आलेला ओला कोवळा व लुसलुशीत चान्यामुळे पातळ शेण तसेच कमी प्रमाणात तंतुमय घटक व पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे दुधातील फॅटमध्ये घसरण दिसून येते. यावर उपाय म्हणजे आहारातील एकुण तंतुमय घटकांचे प्रमाण सर्वसाधारणपणे एनडीएफ (कडबा/वैरण) चे प्रमाण २८ ते ३१ टक्के असणे आवश्यक आहे. तसेच आहारातील एकुण ६५ ते ७५ % एनडीएफ हे चाऱ्यातुन मिळाले पाहीजे. जेणेकरुन रुमेनमधील फायबर मॅट म्हणजे तंतुमय जाळे तयार होण्यास मदत होते व त्यामुळे कोटी पोटातील तंतुमय घटकाचे विघटन होऊन दुधातील फॅटचे सातत्य टिकून राहते.अशाप्रकारे जनावरांचे पावसाळ्यात आरोग्य व्यवस्थापन केल्यास जनावरातील आजारांचे प्रमाण कमी होईल व घटणारी उत्पादन व प्रजोत्पादन क्षमता टिकून राहील. प्राणहानीही टाळता येवून आर्थिक नुकसान टळेल.


Share post:

Popular

More like this
Related

नीलगायीच्या धडकेत दोन मजूर जखमी !

अकोला न्यूज नेटवर्क राहुल सोनोने प्रतिनिधी वाडेगाव दिनांक ०३...

नितीन गडकरींनी दाखवले मोठे स्वप्न एक दिवस येईल देशात पेट्रोल-डिझेल पंप नसतील

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०३ ऑक्टोबर २०२३ :-हवेत उडणाऱ्या...

घरात अचानक गजानन महाराज प्रगटले? दर्शनासाठी भाविकांची तुफान गर्दी, VIDEO व्हायरल

अकोला न्युज नेटवर्क डेक्स दिनांक ०२ ऑक्टोंबर २०२३ :...

फोनच्या कव्हरमध्ये नोट ठेवण्याची सवय ठरू शकते जीवघेणी !

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०२ ऑक्टोबर २०२३ :-मोबाईल कव्हरमध्ये...
error: Content is protected !!