अकोला : सार्वजनिक मानवाधिकार आणि अपराध नियंत्रण परिषद, दिल्लीच्यावतीने सामाजिक कार्यकर्ता राशेदा परवीन रूबीना खान यांना महाराष्ट्र राज्य वुमन वेल्फेयरच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राशेदा परवीन रूबीना खान यांच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्याची दखल घेऊन नियुक्ती करण्यात आली आहे.
जुने शहरातील हमजा प्लॉट रहिवासी सामाजिक कार्यकर्ता राशेदा परवीन रूबीना खान यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण योगदान दिले आहे. महिला आणि युवतींना आत्मनिर्भर करण्यासाठी अनेक सामाजिक उपक्रम, कार्यक्रम राबवून महिला युवतींना दिशा देण्याचे काम केले. तसेच महिला सक्षमीकरण व रोजगाराची उपलब्धता निर्माण व्हावी म्हणून शिलाई मशीन, संगणक प्रशिक्षण दिले आहे. त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक कार्याची दखल घेत त्यांना सार्वजनिक मानवाधिकार आणि अपराध नियंत्रण परिषद, दिल्लीच्या वतीने महाराष्ट्र राज्य वुमन वेल्फेयरच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी राशेदा परवीन यांना नारी शक्ति पुरस्कार, सेल्यूट अवार्ड, इंडिया प्राइड पुरस्कार, इंडियन आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.