अंबिकापुर परीसरात आधीच असमतोल पावसाने पेरण्यांना झालेल्या विलंबामुळे शेतकऱ्यांत अस्वस्थता असताना आता वन्यप्राण्यांच्या चा उपद्रव सुरु झाला अल्प पावसात कशी बशी पेरणी साधुन वर आलेल्या बीजांकुरावर हे वन्यप्राणी हल्ला चढवित असुन पिके फस्त करीत आहेत…त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहे
अकोल्यातील अंबिकापूर परिसरात नुकत्याच पेरण्या झाल्या...आता सोयाबीन कपाशी व तुर या पिकांचे नुकताच त्राण येऊन वाढ होत आहे…..अशात वन्यप्राणी पिकांवर ताव मारत आहेत… या वन्यप्राण्यांना हुसकावून लावणे मोठे जिकरीचे काम असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीपासून च शेतात जागर सुरु केली आहे….माकड हरीण रानडुक्कर तसेच वानराचे कळप पेरणी केलेल्या शेतावर आक्रमण करीत असुन,अंकुरलेली पिके खाऊन शेतीची तुडवणदेखील करीत आहेत… या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी दरवर्षी केली जात असली तरी वनविभागाकडुण फारसे गांभीर्याने घेतले जात नाहीं दरवर्षी हजारो हेक्टरवरील पिके या वन्यप्राण्यांच्या घशात जात असल्याने शेतकरी पुरात हतबल होत आहे… नैसर्गिक आपत्ती तर टळता टळत नाही मनुष्यनिर्मित आपत्ती देखील चुकत नाही… त्यामुळे संकटे शेतकऱ्याच्या पाचवीलाच पुजली जात असल्याचे चित्र आहे