Saturday, November 9, 2024
Homeब्रेकिंगमोहरमच्या मिरवणुकीत राष्ट्रध्वजाचा अपमान; अशोक चक्राच्या जागी लावले तलवारीचे चिन्ह

मोहरमच्या मिरवणुकीत राष्ट्रध्वजाचा अपमान; अशोक चक्राच्या जागी लावले तलवारीचे चिन्ह

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक 31 जुलै२०२३ :-
झारखंडच्या पलामूमध्ये मोहरमच्या मिरवणुकीत राष्ट्रध्वजाचा आपमान करण्यात आला आहे. या मिरवणुकीत जो राष्ट्रध्वज फडकवण्यात आला त्यात अशोक चक्राच्या जागी तलवार छापण्यात आली होती.

यासोबतच उर्दूमध्येही काही शब्दही लिहिले होते. या प्रकरणी पोलिसांनी १८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

राजधानी रांचीपासून सुमारे १७५ किमी अंतरावर असलेल्या चैनपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ही घटना आहे. २८ जुलै २०२३ रोजी संध्याकाळी ही घटना घडली. मोहरमच्या दिवशी ताजिया काढण्यात आला आणि ही मिरवणूक शाहपूर, कल्याणपूर आणि कांकरी या भागातून गेली. याचं मिरवणुकीत राष्ट्रध्वजाचा अपमान करण्यात आला.

या मिरवणुकीत डीजेवर नाचणाऱ्या लोकांच्या हातात तिरंगा झेंडेही होते. या ध्वजातील इतर सर्व काही राष्ट्रध्वजाप्रमाणेच होते पण अशोकचक्र गायब होते. अशोक चक्राच्या जागी उर्दूमध्ये काही शब्द लिहिले होते आणि खाली तलवारीचे चित्र होते. आजूबाजूच्या लोकांनी या तिरंग्याचे फोटो काढले.

अतिरिक्त पोलिस अधीक्षक (एएसपी) ऋषव गर्ग यांनी सांगितले की, मिरवणुकीत ‘राष्ट्रीय ध्वज’ फडकवला गेला. मात्र, जेव्हा त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा लोकांच्या लक्षात आले की तिरंग्याशी छेडछाड करण्यात आली आहे आणि अशोक चक्राच्या जागी तलवार बनवण्यात आली आहे. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.

एएसपी गर्ग म्हणाले, ‘अशोक चक्राच्या जागी उर्दूमध्ये काही शब्द लिहिले होते आणि खाली तलवारीचे चिन्ह होते. या प्रकरणी राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायद्यांतर्गत १८ जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या घटनेवर झारखंडचे भाजप नेते दीपक प्रकाश यांनी ट्विट करून नाराजी व्यक्त केली आहे. त्याचवेळी भाजप नेते दिनेशानंद गोस्वामी यांनी हा तुष्टीकरणाच्या राजकारणाचा धोकादायक खेळ असल्याचे म्हटले आहे.

दीपक प्रकाश यांनी ट्विटमध्ये लिहिले की, ‘पलामू जिल्ह्यातील मोहरम मिरवणुकीत राष्ट्रध्वजाशी छेडछाड करणे ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे, अशोक चक्र काढून तिरंगा ध्वजात उर्दू शब्द लिहिणे हे संविधानाच्या विरोधात आहे आणि आपल्या राष्ट्रध्वजाचा अपमान आहे. अखेर हेमंत राजमध्ये अशा देशद्रोही शक्ती कशा प्रबळ होत आहेत?

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!
WhatsApp