Saturday, November 9, 2024
Homeब्रेकिंगथोडा वेळ आराम केला, मग जाऊन आत्महत्या केली; मित्राने सांगितली नितीन यांच्या...

थोडा वेळ आराम केला, मग जाऊन आत्महत्या केली; मित्राने सांगितली नितीन यांच्या आत्महत्येची संपूर्ण घटना

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०३ ऑगस्ट २०२३ :-चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येच्या वृत्ताने संपूर्ण सिनेसृष्टीत एक खळबळ उडाली आहे. नितीन देसाई यांनी वयाच्या ५७ व्या वर्षी आत्महत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे ज्या एनडी स्टुडिओसाठी दिवस- रात्र घाम गाळला त्याच स्टुडिओमध्ये नितीन यांनी गळफास लावून आत्महत्या केली. कला दिग्दर्शकाला आर्थिक चणचण भासत असल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.नितीन यांनी ज्यावेळी मृत्यूला कवटाळले, त्यावेळी त्यांचे जवळचे सहकारी दिलीप पिठवा त्यांच्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित होते, त्यांनी १ ऑगस्टच्या रात्री नक्की काय झालं ती संपूर्ण परिस्थिती सांगितली. ई- टाइम्सशी बोलताना दिलीप म्हणाले की, ‘आम्ही दिल्लीहून आलो आणि थेट स्टुडिओत गेलो. त्यांनी आपल्या अटेंडंटला बंगला उघडण्यासाठी सांगितले. कारण त्यांना थोडा वेळ आराम करायचा होता.

‘त्यांनी काही वेळ विश्रांती घेतली. यानंतर काही काम असल्याचे सांगून ते दुसऱ्या मजल्यावर गेले अन् तिथे जाऊन त्यांनी आत्महत्या केली. ते आर्थिक अडचणीत सापडले होते. पण त्यांनी आपले पवईचे कार्यालय विकल्याचे कधीही सांगितले नाही.दिलीप हे फक्त नितीन देसाई यांचे मित्रच नाहीत तर त्यांनी जोश, मेला, देवदास, हम दिल दे चुके सनम या चित्रपटात एकत्र काम केले आहे. या प्रकरणी रायगडचे एसपी म्हणाले की, ‘सेटवर काम करणाऱ्या एका कामगाराने याबाबत पोलिसांना माहिती दिली होती. ते सेटवर पोहोचले तेव्हा नितीन देसाई यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेतच होता. आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत.

नितीन देसाई एनडी फिल्म स्टुडिओचे ते निर्माते आणि संस्थापक होते. एनडी स्टुडिओममध्ये मेला, जोश, मिशन कश्मीर, हम दिल दे चुके सनम, सलमान बॉम्बे, मुन्नाभाई एमबीबीएस, स्वदेश, प्रेम रतन धन पायो इत्यादी अनेक चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण झाले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!
WhatsApp