अकोला न्यूज नेटवर्क डेस्क:- दि.19 :- मुर्तीजापुर ते अमरावती महामार्गावरील नागोली नागठाणा येथे अज्ञात ट्रकच्या धडकेने महिलेचा Road Accident मृत्यू झाल्याची घटना घडली आहे यावेळी जय गजानन आपातकालीन पथक यांना माहिती मिळताच यांनी घटनास्थळ गाठले आहे
मुर्तीजापुर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या नागोली नागठाणा जवळील महामार्गावर हृदयाचे ठोके वाढवणारी घटना अपघाती घटना आज घडली आहे अज्ञात ट्रकच्या धडकेने महिलेचा अपघात झाला आहे या घटनेत सदर महिलेचा घटनास्थळी मृत्यू झाला असून अद्यापही महिलेची ओळख समोर आलेली नाही आहे घटनास्थळी कुठले दुचाकी वाहन दिसून आलेले नाही आहे त्यामुळे ही महिला पादचारी असू शकते असा अंदाज तेथील स्थानिकांनी लावून माहिती दिलेली आहे
एकीकडे जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत पोलीस प्रशासन तसेच संबंधित विभाग अनेक मोहीम राबवून वाहन अपघाताचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे तसेच दुसरीकडे समोर येणाऱ्या वाहन अपघाताच्या घटना या मोहिमे चे प्रभाव कमी करीत आहे शहरात मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये जनजागृतीच्या माध्यमातून रस्ता सुरक्षा अभियानाचा धडा गिरविला जात आहे पण ग्रामीण भागात याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे
यावेळी या घटनेची माहिती मिळतात मूर्तिजापूर येथील जय गजानन आपत्कालीन पथक यांच्या सदस्यांनी घटनास्थळ घाटून या अपघात परिस्थितीला सांभाळण्याचा प्रयत्न केला होता . तसेच महिलेचे अस्तव्यस्त शव ला एकत्र करून शवविच्छेदनासाठी स्थानिक रुग्णालया त पाठविण्याचे कार्य जय गजानन आपत्कालीन पथक चे प्रमुख सेनापती शेवतकर भूषण तिले बादशाह भाऊ अमोल खंडारे आदित्य इंगोले यांच्यामार्फत करण्यात आले आहे
या अपघाताची माहिती मुर्तीजापुर पोलीस स्टेशन ग्रामीण यांना देण्यात आली असून घटनास्थळी पोलीस पोचलेली आहे या घटनेबाबत पोलिसांचा तपास सुरू असून पुढील चौकशी आणि तपास करून अज्ञात वाहन ट्रकचालकावर कायदेशीर कारवाई करणार अशी माहिती समोर आली आहे.
Road Accident