अकोला न्यूज नेटवर्क सागर भलतिलक प्रतिनिधी बोर्डी.(अकोट) दिनांक १५ सप्टेंबर २०२३ : –आस्की किड्स पब्लिक स्कूल अकोट ह्या नामांकित शिक्षण संकुलात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्रेरणा म्हणून सिद्ध होणारे नविन उपक्रम घेतले जातात. त्यातीलच एक अतिशय महत्वाचा असा उपक्रम म्हणजे दर महिन्याला होणारा “सक्सेस मंत्रा” होय.
या उपक्रमा अंतर्गत आजवर शाळेमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांची मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केल्या गेली आहे. ज्यामध्ये आय. पी. एस. सुरज गुंजाळ सर, आलोकजी खंडेलवाल (संचालक, खंडेलवाल मोटर्स) आणि प्रकाशजी पोहरे (संपादक देशोन्नती) यांचा समावेश आहे.
सदर उपक्रम हा दर महिन्याला आयोजित केला जाते. सप्टेंबर महिन्याचे “सक्सेस मंत्रा” देणारे सन्माननीय मान्यवर श्री. सचिनजी बुरघाटे (संचालक, अस्पायर तथा व्यक्तिमत्त्व विकास संस्था तथा आंतरराष्ट्रीय व्याख्याते) हे होते. सचिन बुरघाटे सर यांनी आज मुलांना मंत्रा देताना यशाच्या विविध संदर्भाचा उल्लेख केला. आपल्या प्रेरणादायी मार्गदर्शनात त्यांनी विद्यार्थ्यांना सतत प्रयत्नशील रहावे, नविन संकल्पना अवलंबवाव्या, ध्येयावर नेहमी सातत्यपणाने कार्य करावे, आव्हान पेलताना ज्ञान वृद्धिंगत करावे, यश अपयश या सोबत सकारात्मक व्यवहार कसा करावा, लोकनिंदा कशी दूर ठेवावी इत्यादी बाबी स्पष्ट करून सांगितल्या. सचिन सरांच्या मार्गदर्शनानंतर विद्यार्थ्यांनी त्यांना काही शंका प्रश्नरूपाने विचारल्या ज्याला त्यानी अतिशय मोकळेपणाने त्यांनी उत्तर दिले.
आणि मुलांच्या समस्या सोडवल्या. ह्या कार्यक्रमाला वर्ग ७ ते १० चे विद्यार्थी हजर होते. यावेळी विचारपिठावर शाळेचे सचिव नितीनजी झाडे सर यांच्या सोबत प्राचार्य नेहा झाडे मॅडम यांची उपस्थिती होती. ह्या कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य तथा अकॅडमीक हेड पवन चितोडे सर यांच्या नेतृत्वात शिक्षक मनिष सरकटे सर व वैशाली कुलकर्णी मॅम यांनी केले. सदर कार्यक्रमात सचिन बुरघाटे सर यांची ओळख मयुरी गोळे मॅम यांनी करून दिली तर संचलन वर्ग ९ च्या विद्यार्थीनी गार्गी भिरडे व श्रेया घुगे यांनी तर आभार प्रदर्शन ईश्वरी भालतिलक हिने केले. यावेळी अरुणा काळे मॅम यांच्या नेतृत्वातील स्काऊट गाईड पथकाने ड्रिल च्या सहाय्याने पाहुण्यांचे यथोचित स्वागत केले. यावेळी संपूर्ण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता.