अकोला न्युज डेक्स दिनांक २३ ऑक्टोबर २०२३ :-Bishan Singh Bedi Sardar off-spinner passes away : आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धा भारतात खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेतील पाचवी फेरी सुरु आहे. टीम इंडियाने रविवारी 22 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडला पराभूत करत सलग पाचवा विजय मिळवला.
त्यानंतर आता टीम इंडियाचा पुढील सहावा सामना हा थेट 29 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या दरम्यान क्रिकेट विश्वातून अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. दिग्गज क्रिकेटरचं निधन झालं आहे. त्यामुळे क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. टीम इंडियाला वर्ल्ड कप दरम्यान मोठा झटका लागला आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी दिग्गज क्रिकेटपटू बिशन सिंह बेदी यांनी जगाचा निरोप घेतला आहे. बिशन सिंह बेदी यांनी वयाच्या 77 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
बिशन सिंह बेदी हे त्यांच्या काळातले दिग्गज स्पिनरपैकी एक होते. बिशन सिंह बेदी यांनी टीम इंडियाचं नेतृत्वही केलं होतं. बिशन सिंह बेदी यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरली. सोशल मीडियावर नेटऱ्यांनी बिशन सिंह बेदी यांना श्रद्धांजली अर्पण केलीय. प्रत्येक जण बिशन सिंह बेदी यांच्याबाबतच्या क्रिकेटच्या आठवणींना उजाळा देत आहे. तसेच बीसीसीआयनेही ट्विट करत बिशन सिंह बेदी यांन श्रद्धांजली वाहिली आहे
बिशन सिंह बेदी यांनी 1967-1979 दरम्यान टीम इंडियाचं 67 कसोटी सामन्यांमध्ये 266 विकेट्स घेतल्या. तसेच बिशन सिंह बेदी यांनी 10 वनडे मॅचमध्ये 7 बळी घेतल्या. तसेच बेदी यांनी 14 वेळा 5 विकेट्स घेतल्या तर एकदा 10 विकेट्स घेण्याचा कारनामा केलाय. बेदी हे स्पिनरच्या चौकडीपैकी एक होते. बेदी यांच्याशिवाय यामध्ये इरापल्ली प्रसन्ना, भागवत चंद्रशेखर आणि श्रीनिवास वेंकटराघवन यांचा समावेश होता.
माजी कर्णधार आणि टीम मॅनेजर
बेदी यांनी टीम इंडियाला पहिला एकदिवसीय सामना जिंकून देण्यात निर्णायक भूमिका बजावली होती. बेदी यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीचं प्रतिनिधित्व केलं. बेदी यांनी भारतीय क्रिकेट संघाचं 1966 ते 1978 या कालावधीत प्रतिनिधित्व केलं. तसेच बेदी यांनी 1990 साली न्यूझीलंड आणि इंग्लंड दौऱ्यादरम्यान टीम इंडियाच्या व्यवस्थापकाची भूमिका पार पाडलेली. इतकंच नाही, तर मुरली कार्तिक, मनिंदर सिंह यांच्यासह अनेक खेळाडूंना घडवण्यामागे बेदी यांनी मोलाची भूमिका पार पाडली.